Advertisement

सोसायट्यांचा कचरा आणखी ६ महिने उचलणार


सोसायट्यांचा कचरा आणखी ६ महिने उचलणार
SHARES

मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओला व सुका कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावी, अशाप्रकारचे फर्मान सोडणाऱ्या प्रशासनाने अखेर जारी केलेले परिपत्रक पुढील ६ महिन्यांकरता मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत महापालिका आयुक्तांनी ही तयारी दर्शवली आहे.


नगरसेवकांमध्ये संताप

मुंबईतील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या कचरा २ ऑक्टोंबरपासून उचलला जाणार नसल्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी काढले आहे. याबाबत विरोधी पक्षनेते रवी  राजा यांनी सभागृहात निवेदन करून वाचा फोडल्यानंतर यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची सभा बोलावण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त अजोय मेहतासह अतिरिक्त आयुक्त विजय  सिंघल व उपायुक्त उपस्थित होते.


हॉटेल्स, मॉल्समध्ये सक्ती करा

याबैठकीत गटनेत्यांनी हॉटेल्स, मॉल्ससह इंडस्ट्रियल कॉप्म्लेक्स यामध्ये कचरा वर्गीकरण व विल्हेवाटीची सक्ती करण्यात यावी. परंतु गृहनिर्माण सोसायट्यांना याची सक्ती करण्यात येवू नये. याबाबतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.


नगरसेवक निधीतूनही देणार खतनिर्मितीचे उपकरणे

तसेच नगरसेवक निधीतून खतनिर्मिती प्रकल्पाची मशिन देण्यात यावी, अशी सूचना गटनेत्यांनी केली. त्यानंतर आयुक्तांनी हे परिपत्रक ६ महिने पुढे ढकलण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच नगरसेवक निधीतून ही उपकरणे देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून अधिनियमात बदल करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितल्याचे गटनेत्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


मुदत हवी असेल तर अर्ज करा

दरम्यान महापालिका आयुक्तांच्या माध्यम सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, जी संस्था पुढील तीन महिन्यांमध्ये हे कचरा विल्हेवाटीचे तसेच वर्गीकरणाचे प्रकल्प राबवतील त्यांनाच मुदत दिली जाईल, असे सांगितले. यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने महापालिकेकडे अर्ज करून लेखी परवानगी मागावी. त्यानुसारच ही मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.



हेही वाचा -

समीर आणि मीराचं होणार ब्रेकअप



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा