महापौरांकडे मागितली दाद, तर परवानेच झाले रद्द!

Bandra west
महापौरांकडे मागितली दाद, तर परवानेच झाले रद्द!
महापौरांकडे मागितली दाद, तर परवानेच झाले रद्द!
See all
मुंबई  -  

वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोड आणि हिल रोडवरील 18 स्टॉल्सधारकांनी महापालिकेच्या नियम आणि अटींचे उल्लंघन केल्यामुळे या स्टॉल्सधारकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर येथील काही स्टॉल्सधारकांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे दाद मागण्यासाठी धाव घेतली खरी. पण स्टॉल्सवरील कारवाई थांबण्याऐवजी उलट अधिक तीव्र करण्यात आली. या सर्व स्टॉल्सधारकांनी महापौरांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचे परवानेच महापालिकेने रद्द केल्याचे म्हटले जात आहे.वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोड आणि हिल रोडवर कपडे, चप्पल, कटलरी साहित्य विक्रीचे स्टॉल्स आहेत. हे सर्व परवानाधारक फेरीवाले आहेत. या फेरीवाल्यांना ज्या अटी आणि शर्तींच्या आधारे परवाने देण्यात आले होते, त्या अटी आणि शर्तींचे स्टॉलधारकांनी उल्लंघन केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.हे देखील वाचा -

मिठीला फेरीवाल्यांचा विळखा

हे देखील वाचा - 

फेरीवाला दिसल्यास कापणार आरपीएफचा पगारज्या वस्तू विकण्यासाठी या स्टॉलधारकांना परवाने देण्यात आले होते. त्या वस्तूंऐवजी दुसऱ्या वस्तू विकणे, स्टॉलसाठी निश्चित केलेल्या जागेपेक्षा अधिक जागेचा वापर करणे तसेच स्टॉल दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यास देणे, अशा बेकायदेशीर बाबी दोन वेळा केलेल्या पाहणीत आढळून आल्या. त्यामुळे लिंकिंग रोडवरील 17 आणि हिल रोडवरील 1 अशाप्रकारे 18 स्टॉल्सधारकांचे परवाने रद्द करत त्या स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली
- शरद उघडे, सहाय्यक आयुक्त, एच-पश्चिम विभाग, महापालिका

लिंकिंग रोडवरील काही स्टॉल्सधारकांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवून घेतली. केवळ माझ्याकडे आले म्हणून या स्टॉल्सधारकांवर पुन्हा कारवाई करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्टॉल्सवर कारवाई करू नका, असे आपण कुठेही म्हटले नव्हते. कारवाई जरूर करा, परंतु कारवाईचे निकष लावताना सर्वांना समान न्याय दिला जावा हीच आपली भावना होती. केवळ आपल्याकडे ही मंडळी आली म्हणून नेमक्या त्याच स्टॉल्सधारकांचे परवाने रद्द करणे योग्य नाही. 

- विश्वनाथ महाडेश्वर, महापौरहे देखील वाचा - 

फॅशन स्ट्रीटवरील 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्दहॉटेलचा मालकही फेरीवाला

विशेष म्हणजे लिकिंग रोडवर कारवाई करण्यात आलेल्या स्टॉलपैकी एक स्टॉल हा त्याच ठिकाणी 2 मोठी हॉटेल्स असलेल्या मालकाचा आहे. ज्यांना उपजिविकेचे अन्य कोणतेही साधन नाही, अशा व्यक्तींना उपजिविकेचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पूर्वी हे परवाने देण्यात आले होते. मात्र काही मोठी उपहारगृहे स्वतःच्या नावावर असूनदेखील ती व्यक्ती फेरीवाला म्हणून स्टॉल चालवत होती. या व्यक्तीचा परवाना रद्द करून त्यांच्या स्टॉलवर कारवाई केल्याचे शरद उघडे यांनी सांगितले.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.