मिठीला फेरीवाल्यांचा विळखा

Vakola
मिठीला फेरीवाल्यांचा विळखा
मिठीला फेरीवाल्यांचा विळखा
मिठीला फेरीवाल्यांचा विळखा
See all
मुंबई  -  

वाकोला परिसरातील मिठी नदीच्या बाजूला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. विशेष म्हणजे हे फेरीवाले सगळा कचरा मिठी नदीतच टाकत असल्याने मिठीला अडथळा निर्माण होतोय. त्यामुळे या फेरीवाल्यांपासून मिठीची सुटका करा, अशी मागणी वाकोला एएलएमच्या माध्यमातून होत आहे. मिठीच्या बाजूचा परिसर ना फेरीवाला बनवण्यासाठी एएलएमच्या माध्यमातून प्रयत्नही करण्यात आले. मात्र त्यांना अद्यापही यश आलेले नाही. या फेरीवाल्यांना दुसऱ्या जागी हलवावे, अशी मागणी देखील मनपाला एएलएमच्या माध्यमातून करण्यात आली आहे.दरम्यान, वाकोला बाजार हा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. मिठी नदी ही फक्त फेरीवाले दूषित करतात हा समज चुकीचा आहे. मिठी नदीच्या समस्येकडे सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे स्थानिक फेरीवाले रामलाल यादव यांनी सांगितले आहे.

मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी संपूर्ण मनपा यंत्रणा कार्यरत आहे. पण मुंबईची लोकसंख्या पाहता आणि त्यातून तयार होणारा कचरा यासाठी लोकसहभागातून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अॅडव्हान्स लोकल कमिटीची मनपाद्वारे 1998 साली स्थापना करण्यात आली. त्यामुळे लोकांनीही मनपाला सहकार्य करून ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे नियोजन करावे, जेणेकरून आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहील, असे मनपा अधिकारी सुभाष पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा - 

मिठीची परिस्थिती आजही जैसे थे!


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.