फेरीवाला दिसल्यास कापणार आरपीएफचा पगार

 Dahisar
फेरीवाला दिसल्यास कापणार आरपीएफचा पगार
फेरीवाला दिसल्यास कापणार आरपीएफचा पगार
फेरीवाला दिसल्यास कापणार आरपीएफचा पगार
See all

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या फलाटावर फेरीवाला दिसला, तर आता आरपीएफच्या वरिष्ठ निरीक्षकाचा एक दिवसाचा पगार कापला जाणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाच्या आरपीएफ आयुक्तांनी केलेल्या निरीक्षणानंतर वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांचा एक दिवसाचा पगार कापला गेलाही आहे. अवैध फेरीवाल्यांचं स्टेशनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मुंबई मंडळ आरपीएफचे आयुक्त अनुप कुमार शुक्ला सर्व स्टेशनवर निरीक्षण करत आहेत. या दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईही केली जाईल. ज्या स्टेशनवर फेरीवाले दिसतील तिथे कार्यरत असलेल्या वरिष्ठ निरीक्षकांचा पगार कापला जाईल.

Loading Comments