Advertisement

बायोमेडिकल वेस्ट फेकतात उघड्यावर : महापौरांचे चौकशीचे आदेश


बायोमेडिकल वेस्ट फेकतात उघड्यावर : महापौरांचे चौकशीचे आदेश
SHARES

मुंबईतील सर्व रुग्णालय, प्रसुतीगृह, आरोग्य केंद्र आणि दवाखान्यांमध्ये दरदिवशी निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. मात्र, तरीही हा बायोमेडीकल वेस्टचा कचरा उचलून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो उघड्यावर लोकवस्तीत फेकला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झाल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी उघडकीस आणून दिल्यानंतर महापौरांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत.


इंजेक्शन, रक्तांचे नमुने उघड्यावरच

कुर्ला येथील गुलमोहर रोडवर गुरुवारी उघड्यावरच बायोमेडिकल वेस्ट बेकायदेशीरपणे टाकल्याचा आरोप हरकतीच्या मुद्दयाद्वारे उपस्थित करण्यात आला. एका बाजूला महापालिका ओला व सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करत आहे, तर दुसरीकडे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे इंजेक्शन सुया, औषधं, ड्रेसिंगसाठी वापरण्यात येणारे सामान, रक्ताच्या सुया आदी बायोमेडिकल वेस्ट उघड्यावरच टाकले आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.



कंपनीवर एफआयआर दाखल करा

सपाचे गटनेते रईस शेख यांनी पाठिंबा देताना, बायोमेडिकल वेस्ट गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एसएमएस या कंपनीची नियुक्ती केली आहे. परंतु, त्यांच्याकडून याची योग्यप्रकारे कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी शेख यांनी केली.


पुन्हा त्याच सामानाचा वापर

बायोमेडिकल वेस्टबाबत १९९८ला कायदा बनवण्यात आला आणि याची अंमलबजावणी २०१६पासून केली जात आहे. कोणत्याही प्रकारे बायोमेडिकल वेस्ट हे उघड्यावर टाकणे योग्य नसून अशा प्रकारच्या बायोमेडिकल वेस्टमधील रक्ताच्या नमुन्यांचा संपर्क झाल्यास हेपेटायटिस, तसेच एचआयव्हीसारख्या आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे कुर्ला येथे अशा प्रकारे डायग्नोस्टिक सेंटरद्वारे वेस्ट टाकल्याचे समोर आले असले, तरी मुंबईत असे प्रकार घडत आहे. आपण नेमलेली कंपनीच अशा बायोमेडिकल वेस्टमधील सामान पुन्हा वापरात आणत आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. सईदा खान यांनी व्यक्त केली.



बायोमेडिकल वेस्ट उघडयावर टाकणे हे योग्य नसून कप्तान मलिक यांनी निदर्शनास आणून दिलेल्या प्रकरणाची तसेच मुंबईत बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराची चौकशी केली जावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी केली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा