Advertisement

६६ हजार मुंबईकरांकडून स्वच्छता अॅप डाऊनलोड, तक्रारी आल्या ४६ हजारांच्या घरात


६६ हजार मुंबईकरांकडून स्वच्छता अॅप डाऊनलोड, तक्रारी आल्या ४६ हजारांच्या घरात
SHARES

मुंबई स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन महापलिकेकडून केलं जात असून आतापर्यंत ६६ हजार मुंबईकरांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. आश्चर्याचीबाब म्हणजे मुंबईकरांकडून अॅप डाऊनलोड केले जात असतानाच कचऱ्याच्या तक्रारींचाही पाऊस महापालिकेवर कोसळू लागला आहे. आतापर्यंत या अॅपद्वारे ४६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणि या तक्रारींचं निराकरण करण्यात आलं असलं तरी अजुनही सुमारे दीड हजार मुंबईकरांच्या तक्रारींचं निवारण प्रलंबितच आहे.


इतक्या तक्रारींचं निराकरण

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१८ हे जानेवरीच्या पहिल्या आठवडयात सुरू होत असून, या सर्वेक्षणात जास्तीतजास्त नागरिकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केल्यास स्वच्छ भारत अभियानात मुंबईचं स्थान अग्रभागी राहील. यासाठी लाखो मुंबईकरांनी ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करावं असं आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केलं आहे. या आवाहनाला मुंबईकरांनी मोठा प्रतिसाद दिला असून सुमारे ६२ हजार मुंबईकरांनी हा ‘स्वच्छता अॅप’ आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. आतापर्यंत महापालिका प्रशासनाकडे या अॅपद्वारे ४६ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी प्रशासनाने ४४ हजार ५०० तक्रारींचं निराकरण केलं असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


प्रबोधनासाठी प्रसारमाध्यमांचा वापर

सर्वात आधी GOOGLE PLAY STORE / APPLE APP STORE वरुन “Swachhata-MoHUA app” डाऊनलोड करावं लागतं. ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड झाल्यानंतर नागरिकांना ज्या-ज्या सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास तेथील फोटो काढून या अॅपद्वारे पाठवल्यास मुंबई महापालिका त्वरीत २४ तासाच्या आत स्वच्छतेबाबतची कार्यवाही करते, असं सिंघल यांनी स्पष्ट केलं. ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करा, असं आवाहन करण्यासाठी महापालिकेनं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांचा वापर केलेला आहे.

 


यामध्ये दुरचित्रवाहिनीद्वारे सुप्रसिद्ध कलाकार श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी ‘स्वच्छता अॅप’ नागरिकांनी डाऊनलोड करण्याच्या बाबतीत आवाहन केलं आहे. तसेच रेल्वे-स्टेशन, बस थांबा विविध मॉल या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आणइ कर्मचारी पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत मुंबईकर नागरिकांमध्ये प्रबोधन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बेस्टच्या सर्व आगारांमध्येही याबाबत प्रबोधन करून त्यांना अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन केलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा