नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या 30 वर, 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईमधील कंटेन्मेंट झोनची संख्या 111 वरून 30 वर आली आहे.  सर्वाधिक 11 कंटेन्मेंट झोन तुर्भे परिसरात आहेत.  तर नेरूळमध्ये 6, ऐरोलीत 4, बेलापूर व घणसोलीत 2, दिघामध्ये 3 तर वाशीसह कोपरखैरणेत प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश आहे.

नवीन नियमाप्रमाणे एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण सापडला तरी तेवढीच सदनिका सील केली जाते. त्या सोसायटीमधील इतर इमारती सील केल्या जात नाहीत. एखाद्या दुकानामध्ये रुग्ण सापडला तर त्याच्या डाव्या व उजव्या बाजूचे एक दुकान सील केले जात आहे. झोपडपट्टी व बैठय़ा चाळींतही रुग्ण सापडलेले घरच सील केले जाते. एकापेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्यास आरोग्य विभाग गांभीर्य लक्षात घेऊन परिसर  कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करीत आहे. सुधारित नियमावलीमुळे अनेक ठिकाणी बंद केलेले रोड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

कंटेन्मेंट झोन


हेही वाचा -

'असे' आहेत मिरा रोड-भाईंदरमधील कंटेन्मेंट झोन


पुढील बातमी
इतर बातम्या