मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल हा भुयारी मार्ग, फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17 हजार 36 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.
तसेच नवी मुंबई मेट्रो (navi mumbai metro) मार्ग 1 ए आणि मार्ग 2 च्या 5 हजार 575 कोटी रुपयांच्या अशा एकूण 22 हजार 611 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.