लक्ष द्या! नवी मुंबईत आठवड्यातून एकदा पाणीकपात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महापालिकेवरही सध्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रदीर्घ पाऊस आणि कमी पाऊस यामुळे महापालिकेने पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन करून आठवड्यातून एक दिवस सायंकाळी पाणीपुरवठा न करण्याचे नियोजन केले आहे.

त्यामुळे ही पाणीकपात आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन शुक्रवारपासून राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. यावर्षी धरण क्षेत्रात कमी पावसाची नोंद झाल्यामुळे मोरबे धरण पूर्ण भरले नाही.

नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही दिवसेंदिवस वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्यामुळे सध्या केवळ ३९.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून मोरबे धरणात ९ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. नवी मुंबई शहरात पाणीकपात होणार असून शुक्रवारपासूनच पाणीकपात होणार आहे.

या दिवशी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही

  • सोमवार- बेलापूर
  • मंगळवार- कोपरखैरणे
  • बुधवार- घणसोली
  • गुरुवार- वाशी
  • शुक्रवार- ऐरोली
  • शनिवार- नेरुळ
  • रविवार - तुर्बे


हेही वाचा

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 26 टक्के पाणी शिल्लक

पुढील बातमी
इतर बातम्या