Advertisement

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 26 टक्के पाणी शिल्लक

मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 26 टक्के पाणी शिल्लक
SHARES

संपूर्ण मुंबईला(Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये(Dam) फक्त 26 टक्केच पाणीसाठा आता शिल्लक राहीला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. 

मुंबईला सात धराणांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये विहार, तुळशी, तानसा, भातसा, मोडक, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा. परंतु या सातही धरणांमध्ये मिळून फक्त 26 टक्केच पाणीसाठा मुंबईकरांसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मागील वर्षी याच काळात हा पाणीसाठा 30 टक्के होता मात्र आता हा पाणीसाठा कमी झाल्याचं पहायला मिळतयं. तसेच यावर्षी कमी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याचसाठी मुंबईला अतिरिक्त साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली आहे.  

मुंबई महानगरपालिकेने देखील राज्य सरकारला पत्र लिहून अतिरिक्त पाण्याचा साठा उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली आहे. हे पत्र आता मंत्रालयात असून राज्य सरकार आता त्यावर योग्य निर्णय लवकरच घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.

फक्त 26 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईकरांसाठी आता पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा 30 टक्के होता त्यामुळे पाण्याच्या टंचाईची फारशी भिती नव्हती.

परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण देखील कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. 

हा पाणीसाठा येणाऱ्या काळात आणखी कमी झाला तर मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल असे देखील सांगण्यात येत आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा