नवी मुंबई : वंडर्स पार्क 31 डिसेंबरला बंद राहणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईतील नेरूळ येथील सेक्टर-19 ए येथील वंडर्स पार्क 31 डिसेंबर 2023 रोजी महापालिका बंद ठेवणार आहे. 01 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी, 31 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वंडर्स पार्क हे नेरूळ, नवी मुंबई हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे ज्याची देखभाल नवी मुंबई महानगरपालिकेने केली आहे. पर्यटकांना एकाच ठिकाणी जगातील आश्चर्ये पाहण्याचा अनोखा अनुभव देण्यासाठी उद्यानाची रचना करण्यात आली आहे.

आयफेल टॉवर, ताजमहाल, लीनिंग टॉवर ऑफ पिसा, ग्रेट वॉल ऑफ चायना, कोलोसिअम, क्राइस्ट द रिडीमर आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यासह प्रसिद्ध लँडमार्क्सच्या स्केल-डाउन या 7 आश्चर्यांची प्रतिकृती साकारता येते. 


हेही वाचा

'तिसऱ्या मुंबई'ला राज्य सरकारची मंजुरी, असे असेल हायटेक शहर

पुढील बातमी
इतर बातम्या