मुंबईची लॉकडाऊच्या दिशेनं वाटचाल; १९२२ जणांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी १ हजार ९२२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसंच, १५ हजारांच्या पुढे गेली असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५६ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ३ लाख ४७ हजार ५८१ झाली आहे, मृतांची संख्या ११ हजार ५३९ वर गेली आहे.

एका दिवसात १ हजार २३६ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ३ लाख १९ हजार ७८७ म्हणजेच ९२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून सध्या १५ हजार २६३ रुग्ण उपचाराधीन आहेत. उपचाराधीन रुग्णांपैकी गंभीर रुग्णांची संख्या ४५० आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे.

सोमवारी १९ हजार चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांपैकी तब्बल १० टक्क्यांहून अधिक अहवाल बाधित आले आहेत. आतापर्यंत ३५ लाख ९३ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो ०.४५ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही १५६ दिवसांपर्यंत खाली गेला आहे.


हेही वाचा -

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

दर आठवड्याला कोरोना लसीचे २० लाख डोस द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या