Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यात कोरोनाचा होणारा फैलाव चिंताजनक आहे. रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे.

चिंता वाढली, राज्यात १७ हजार ८६४ कोरोनाचे नवे रुग्ण
SHARES

राज्यात कोरोनाचा होणारा फैलाव चिंताजनक आहे. रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे.  मंगळवारी राज्यात कोरोनाचे १७ हजार ८६४ नवीन रुग्ण आढळले. तर ८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ९ हजार ५१० रुग्ण  बरे झाले आहेत. राज्यात  एकूण २१,५४,२५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९१.७७ टक्के एवढे झाले आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,४७,३२८ (१३.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ६ हजार ६७ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ८१३ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ हजार ८१७ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो १९ हजार ५५८ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १३ हजार ८६२ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १३ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा