Advertisement

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

मुंबईत रोज १०-१२ दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी घटत आहे. सध्या मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १६५ दिवसांवर आला आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. रोज वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढत असल्याने रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही  मोठ्या प्रमाणावर घटला आहे. मुंबईत रोज १०-१२ दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी घटत आहे. सध्या मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १६५ दिवसांवर आला आहे. 

मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन १७१२ रुग्ण आढळले आहेत.  तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईमधील कोरोना वाढीचा दर सरासरी ०.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक टक्क्याने घसरून ९२ टक्के झालं आहे.मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या तीन लाख ४५ हजार ६५९ वर पोहोचली आहे. तर ११ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी १०६३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत  तीन लाख १८ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत सध्या १४ हजार ५८२ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३१ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. तर २२० इमारती सील केल्या आहेत. 



हेही वाचा -

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा