मुंबईत ३,५१२ नवे रुग्ण, ८ मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या सतत वाढत असून मंगळवारी ३,५१२ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरातील चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण वाढत असून १५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही २७ हजाराच्यापुढे गेली आहे. एकूण बाधितांची संख्या ३ लाख ६९ हजार ४२६  झाली आहे, तर मृतांची संख्या ११ हजार ६०० वर गेली आहे.

एका दिवसात १,२०३ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ३ लाख २९ हजार २३४ म्हणजेच ९० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या २७ हजार ६७२ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढत असून तो ०.७४ टक्के झाला आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधीही ९० दिवसांपर्यंत खाली आला आहे.

देशात ४०,७१५ जणांना संसर्ग

देशात गेल्या एका दिवसात आणखी ४० हजार ७१५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे देशातील बाधितांची एकूण संख्या एक कोटी १६ लाख ८६ हजार ७९६ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ४५ हजार ३७७ वर पोहोचली असून त्यामध्येही सलग १३व्या दिवशी वाढ झाली आहे.

देशात कोरोनामुळे एकूण एक लाख ६० हजार १६६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५३ हजार ४५७ जण महाराष्ट्रातील आहेत. देशात गेल्या २४ तासांत १९९ जणांचा मृत्यू झाला.


हेही वाचा - 

राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण

यंदा होळी सण साजरा करण्यास मनाई


पुढील बातमी
इतर बातम्या