Advertisement

यंदा होळी सण साजरा करण्यास मनाई

या वाढत्या प्रदूर्भावामुळं राज्य सरकारनं ठिकठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. अशातच आता होळी सणावर ही कोरोनाचं सावट येण्याची आलं आहे.

SHARES

होळी सण अवघ्या ७ दिवसांवर आला असून, नागरिकांनी होळीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या वाढत्या प्रदूर्भावामुळं राज्य सरकारनं ठिकठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. अशातच आता होळी सणावर ही कोरोनाचं सावट येण्याची आलं आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता होळीबाबत महापालिकेनं निर्बंध जरी केले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं यंदा होळी सण साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, धुलीवंदन ही साजरा करण्यास मनाई घालण्यात आली आहे. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी होळी अथवा धुलीवंदन साजरा केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडाही वेगानं वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. त्यातूनच होळी सणाबाबत पालघर जिल्हा प्रशासनानं आतापासूनच मोठं प्रतिबंधात्मक पाऊल उचललं आहे. पालघर जिल्ह्यात होळीबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, पालघर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल्स आणि रिसॉर्टवर होळी सेलिब्रेशन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या २८ मार्च रोजी होळी पौर्णिमा आहे तर २९ मार्च रोजी धूलिवंदन आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन सेलिब्रेशन करण्यास जिल्ह्यात मनाई राहणार आहे.

पालघर जिल्ह्यात बीचेस तसेच रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व ठिकाणी होळी सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी होत असते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा