मुंबईत एका दिवसात ३,७७५ जणांना कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून मुंबईत रविवारी ३,७७५ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. मुंबईत संसर्ग प्रसार वेगाने होत असून रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरात १८६ दिवसांवरून १०६ दिवसांवर आला आहे. रविवारी मुंबईत १० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

मृतांमध्ये ९ जण ६० वर्षांवरील होते, तर ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईत सध्या २३ हजार ४४८ रुग्ण उपचाराधीन असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. रविवारी १६४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मागील चोवीस तासांत बाधितांच्या संपर्कातील २१ हजार २०८ जणांचा शोध घेण्यात आला आहे.

मुंबईत सध्या ३१६ गृहसंकुले रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित आहेत, तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या ४० वर गेली आहे.


हेही वाचा -

शरद पवारांनी उल्लेख केलेले ज्युलिओ रिबेरो कोण आहेत? जाणून घ्या

तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी भरा आयटीआर, मिळतील 'हे' फायदे


पुढील बातमी
इतर बातम्या