सातत्याने वाढणाऱ्या कैद्यांच्या संख्येमुळे महाराष्ट्रातील (maharashtra) कारागृहे अपेक्षेहून जास्त भरली आहेत. राज्यभरातील, विशेषतः मुंबई (mumbai) महानगर प्रदेशातील (mmr) कारागृहे त्यांच्या मंजूर क्षमतेपेक्षा खूप जास्त क्षमतेने कार्यरत आहेत.
आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह, भायखळा, तळोजा आणि ठाणे येथील कारागृहे (prison) सर्वाधिक गर्दीची आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
गर्दीची समस्या कमी करण्यासाठी विभाग प्रस्तावित मानखुर्द कारागृहावर आशा लावून बसला आहे.
मानखुर्द येथील 11 एकरचा अतिक्रमणमुक्त भूखंड विभागाला कारागृहाच्या बांधणीसाठी आधीच सुपूर्द करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत बांधकामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रशासन तुरुंग कर्मचाऱ्यांच्या तीव्र कमतरतेचाही सामना करत आहे. अति गर्दीमुळे अपुरी स्वच्छता, पाण्याची टंचाई आणि कैद्यांमध्ये आजारांचा वाढलेला धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे तुरुंगातील परिस्थिती आणि कैद्यांच्या कल्याणाबद्दल चिंता वाढली आहे.
भारतातील सर्वात जुन्या तुरुंगांपैकी एक असलेला आर्थर रोड तुरुंग, ब्रिटिशांनी 1926 मध्ये स्थापन केला होता. सहा एकर परिसरात पसरलेल्या या तुरुंगाची मंजूर क्षमता 999 कैद्यांची आहे, परंतु सध्या येथे सुमारे 3,410 कैदी आहेत. ही संख्या तुरूंगाच्या क्षमतेच्या तिपटीहून अधिक आहे.
पुनर्विकासाचे काम सुरू झाल्यावर कैद्यांना कुठे हलवले जाईल, ही एक मोठी चिंता आहे. जवळपासची इतर कारागृहे आधीच खचाखच भरलेली आहेत, त्यामुळे स्थलांतरासाठी फारच कमी जागा उरली आहे.
ठाणे कारागृहाची मंजूर क्षमता 1,086 कैद्यांची असून, सध्या तिथे 2,936 कैदी आहेत. नवी मुंबईतील तळोजा कारागृहाची क्षमता 2,124 असूनही तिथे 2,949 कैदी आहेत, तर कल्याण कारागृहदेखील 2,025 कैद्यांसह आपल्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यायालयांच्या जवळ असल्यामुळे आर्थर रोड, ठाणे आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये मोठ्या संख्येने कैदी दाखल होत आहेत.
महाराष्ट्रामध्ये नऊ मध्यवर्ती कारागृहे आणि वर्ग 1, 2 व 3 ची 51 जिल्हा कारागृहे, तसेच 19 खुली कारागृहे, तीन महिला कारागृहे, एक खुली वसाहत, एक बालसुधारगृह आणि कारागृह रुग्णालये आहेत.
राज्याच्या तुरुंगांची एकूण मंजूर क्षमता 24,722 कैद्यांची आहे, परंतु सध्या तेथे अंदाजे 42,727 कैदी आहे, तुरुंगातील जागा क्षमतेच्या जवळपास 173% भरलेली आहे.
कारागृहातील कैद्यांमध्ये 41007 पुरुष, 1707 महिला आणि 13 तृतीयपंथी कैद्यांचा (prisoners) समावेश आहे. त्यापैकी बहुसंख्य हे खटला सुरू असलेले कैदी आहेत, ज्यांपैकी बरेच जण गरिबीमुळे वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात.
हेही वाचा