नवी मुंबईकरांसाठी गुडन्यूज, ३० मे रोजीची पाणीकपात रद्द

(File Image)
(File Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महानगरपालिकेकडून (NMMC) प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, कामोठे नोड येथे मंगळवार, 30 मे 2023 रोजी होणारी पाणीकपात पुढे ढकलण्यात आली असून रहिवाशांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

तीव्र उन्हाळ्यात पाणीकपातीवर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पाणीकपातीचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेकडून माहितीनुसार, दिनांक ३० मे २०२३ रोजी कामोठे नोड येथे बेलेगी नियोजित पाणीकपात येत असून नियमित पाणी मिळेल.

याआधी, नवी मुंबई नागरी संस्थेकडून देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे सेक्टर 1-11 आणि सेक्टर 33-36 मध्ये 30 मे रोजी किमान 12 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती सिडकोने दिली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 मे रोजी कमी दाबाचा पुरवठाही जाहीर करण्यात आला होता. 

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोरबे धरण ते दिघा दरम्यानच्या मुख्य पुरवठा मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यासाठी मोरबे धरणाजवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर प्रशासनाने शटडाऊन लागू केले आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना आता नोडलनिहाय रेशनिंग प्रणालीमुळे आठवड्यातून एक दिवस अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था न करता पाणीकपात करणे नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली.

NMMC च्या अहवालानुसार, धरणात फक्त 30 टक्के साठा आहे जो ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच पुरू शकतो. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यास, पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. 


हेही वाचा

पनवेल : पर्यटकांना वडाळे तलावावर माशांना खायला घालण्यास मनाई

मुंबईत 11 जूनपर्यंत जमावबंदी

पुढील बातमी
इतर बातम्या