Advertisement

पनवेल : पर्यटकांना वडाळे तलावावर माशांना खायला घालण्यास मनाई

अनेक पर्यंटक स्वत:सोबत खायला आणलेले पदार्थ माश्यांना खायला देखील घालत असल्याचे दिसून आले आहे.

पनवेल : पर्यटकांना वडाळे तलावावर माशांना खायला घालण्यास मनाई
SHARES

पनवेल महानगरपालिकेने (पीएमसी) वडाळे तलावावर येणाऱ्या पर्यटकांना माशांना काहीही खाऊ न घालण्याचा इशारा दिला आहे.  प्रशासनाने सूचना फलक देखील लगावले आहेत. नुकतेच महापालिकेने सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे.

तलावाच्या विकासामुळे लोक आकर्षित झाले आणि ते स्थानिकांसाठी एक हँगआउट ठिकाण बनला आहे. मात्र, अनेक पर्यंटक स्वत:सोबत खायला आणलेले पदार्थ माश्यांना खायला देखील घालत असल्याचे दिसून आले आहे.

वडाळे तलावाची समस्या कायम

प्रशासकिय संस्थेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,  माशांना पाव, चपात्या, बिस्किटे, उरलेला वाढदिवसाचा केक, पिझ्झाचे तुकडे आणि इतर पदार्थ देत आहेत. यासाठी तिकडे सुरक्षा रक्षक ठेवण्यात आला. तसेच संबंधित नागरिकांना आवाहन करूनही परिस्थिती कायम आहे.

आता, प्रशासकिय संस्थेने गर्दीच्या वेळी परिसरात गस्त घालण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, माशांना खायला देऊ नका, असे फलकही त्यांनी लावले आहेत.

वडाळे तलावाची स्वच्छता मोहीम

पनवेल महानगरपालिकेने (PMC) विद्यार्थी, भारतीय तटरक्षक दलाचे स्वयंसेवक, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या मदतीने पनवेलमधील प्रभाग 18 मधील वडाळे तलाव बल्लाळेश्वर विसर्जन घाटावर शून्य कचरा मोहीम सुरू केली होती.

30 डिसेंबर 2022 रोजी स्वच्छ भारत आणि माझी वसुंधरा या अभियानाचा एक भाग म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. या शून्य कचरा मोहिमेद्वारे प्रशासकिय संस्थेने स्वच्छतेचा संदेश दिला. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.



हेही वाचा

नालेसफाई 100 टक्के पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

अखेर दिलासा! पावसाळ्यात मिलन सबवेत पाणी भरणार नाही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा