Advertisement

मुंबई उच्च न्यायालय: विमानतळावर नमाज पठण करता येणार नाही

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नमाज अदा करण्यासाठी वापरत असलेले तात्पुरते शेड गेल्या वर्षी प्रशासनांनी पाडले.

मुंबई उच्च न्यायालय: विमानतळावर नमाज पठण करता येणार नाही
SHARES

धर्मापेक्षा विमानतळाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कारणासाठी तडजोड होऊच शकत नाही. असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने (bombay high court) विमानतळ परिसरात रमजान निमित्त नमाज पठण करण्याची मागणी  फेटाळून लावली.

न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने अखेर सुरक्षेच्या कारणास्तव याचिका निकाली काढली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा-टॅक्सी आणि ओला-उबर कॅब चालकांना नमाज (namaz) पठण करण्याची परवानगी द्यावी या मागणी करीत टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियनने  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात नमाज अदा करण्यासाठी वापरत असलेले तात्पुरते शेड गेल्या वर्षी प्रशासनांनी पाडले.

तसेच त्यामुळे त्याच जागेचा वापर करण्यासाठी किंवा त्याच परिसरात पर्यायी जागा देण्यासाठी प्रशासनांना आदेश द्यावा, अशा मागणीची याचिका ‘टॅक्सी-रिक्षा ओला-उबर मेन्स युनियन’ने केली होती.

तसेच त्याचा विचार केल्यानंतर याचिकाकर्त्यांसाठी दुसरी जागा उपलब्ध करून देता येते का, याचा विचार करा, असे निर्देश न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. फिरदोस पूनीवाला यांच्या खंडपीठाने गेल्या आठवड्यात दिले होते.

त्यानुसार, प्रशासनांनी गुरुवारी आपला अहवाल दिला. ‘पर्यायी सात जागांची पाहणी केली.

मात्र, सुरक्षेबाबतची चिंता, गर्दी व विमानतळ विकासाच्या आराखड्यामुळे असलेल्या मर्यादा अशा कारणांमुळे त्या जागा सुयोग्य वाटल्या नाहीत’, असे प्रशासनांनी अहवालात स्पष्ट केले.

तसेच तो अहवाल पाहिल्यानंतर, हा प्रश्न विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने याचिकाकर्त्यांना दिलासा देऊ शकत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

न्यायालय नेमकं काय म्हणाले?

  • रमजान गेल्या महिनात 19 फेब्रुवारीला सुरू झाला. विमानतळ परिसरात नमाजासाठी परवानगी मिळाली नाही, म्हणून नमाज पठण थांबले का?

  • नमाज पठण करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. असे असले तरी नमाज पठणासाठी तुम्हाला विशिष्ट जागेचा हट्ट धरून मागणी करता येणार नाही.



हेही वाचा

एसटीच्या मद्यपी चालक आणि वाहकांवर करडी नजर

मध्य रेल्वेच्या होळी स्पेशल ट्रेनमधून 7 लाख प्रवाशांचा प्रवास

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा