आंतरराष्ट्रीय प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून मुंबईत महापालिकेने सूट दिली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्याने ब्रिटन, युरोप, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि मध्य-पूर्व या देशांतून आलेल्या प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये किंवा संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर सात दिवस गृह विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे. दरम्यान, अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. अनेक प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणातून सूट देण्याचा आदेश पालिकेने दिला आहे. 

पालिकेने शनिवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्याच्या प्रमाणपत्रासह स्वयंघोषणापत्र प्रवाशांनी सादर करणं बंधनकारक असणार आहे. तसंच अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी काही डॉक्टर प्रवास करतात. त्यांनाही संस्थात्मक विलगीकरणाच्या अटीतून वगळण्यात येत असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे.

याशिवाय नवीन नियमावलीत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात असलेली गरोदर महिलांना संस्थात्मक विलगीकरणातून वगळलं आहे. मात्र, त्यांना पुढील सात दिवस गृहविलगीकरणात राहणं आवश्यक आहे.


हेही वाचा -

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन
  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

पुढील बातमी
इतर बातम्या