मुंबईत मागील ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू अाहे. हा पाऊस अाता मुंबईकरांसाठी अापत्तीच बनत चालला अाहे. मंगळवारी सकाळी मालाड पूर्वकडील कुरार व्हिलेजमधील पारेख भागात ४ मजली मुंबई महापालिकेच्या शाळेची संरक्षक भिंत कोसळली. यामुळे या ठिकाणी एकच खबळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कसलीही जिवीतहानी झाली नाही.
संरक्षक भिंत कोसळली तेव्हा शाळा बंद होती. शाळा सुरू असती तर मोठी दुर्घटना घडली असती. संरक्षक भिंतीच्या पाठीमागेच एक नाला अाहे. जर यावेळी संरक्षक भिंतीच्या बाजूला कोणी असते तर जीव गमवावा लागला असता. भाजपाचे स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या घटनेला महापालिकेला जबाबदार धरलं अाहे.
भ्रष्टाचाराचा अारोप
ही शाळा बांधताना मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा अारोप नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला अाहे. शाळेची इमारत मोडकळीस अाल्याची तक्रार महापालिकेकडे केली होती. सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असं मिश्रा म्हणाले.
हेही वाचा -
मेट्रो ३ चा ५ किमीचा भुयारी मार्ग पूर्ण
तृतीय वर्ष बी. कॉम.चा निकाल जाहीर