Advertisement

तृतीय वर्ष बी. कॉम.चा निकाल जाहीर


तृतीय वर्ष बी. कॉम.चा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठातर्फे एप्रिल मे महिन्यात घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बी. कॉम. सत्र ५ व ६ चा परीक्षेचा निकाल रविवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. या दोन्ही परीक्षेत १ लाख २ हजार २३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ९५ हजार ७६१ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यातील फक्त ५५ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

नुकत्याच लागेल्या बी.कॉम. सत्र ६ या परीक्षेसाठी एकूण ७४ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ६९.३१ टक्के इतका लागला आहे.


बीकॉम सत्र ६ श्रेणीनुसार निकाल श्रेणी

श्रेणीनुसार - विद्यार्थी संख्या

  • ओ - ४५१
  • ए- ९४७०
  • बी- १२,७२२
  • सी - १३,१५९
  • डी - ८३९८
  • इ - ९३८

तसंच तृतीय वर्ष बी कॉम सत्र ५ परीक्षेचाही निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेसाठी एकूण २७ हजार ३७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २१ हजार ९४८ विद्यार्थी या परीक्षेस बसले असून १० हजार ०५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बी.कॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल ४६.४९ टक्के इतका लागला आहे.


'इथं' बघा निकाल

बी. कॉम. परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या www.mumresults.in या स्वतंत्र वेबसाईटवर जाहीर करण्यात आला असून १ लाखापेक्षा जास्त आसन क्रमांक असल्यानं बीकॉम सत्र ६ च्या आसन क्रमांकानुसार २१ स्वतंत्र फाइल्स त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. तसंच बीकॉम सत्र ५ च्या एकूम १४ स्वतंत्र फाइल्स करून त्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अगदी सुलभ पद्घतीनं निकाल पाहता यावा यासाठी स्वतंत्र फाईल्स करण्यात आली असून सर्व्हरची क्षमताही वाढवण्यात आली आहे.


बीकॉम सत्र ६ चा निकाल हा मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडं विशेष लक्ष दिल्यानं व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच विद्यापीठाचे विविध निकाल वेळेत जाहीर करणं शक्य झाल आहे.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

अहो, आश्चर्यम्! तावडे म्हणतात, ''मुंबईत अतिवृष्टी नाही''

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा