Advertisement

पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा


पावसामुळे परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा
SHARES

सोमवार ९ जुलैला मुसळधार पावसामुळं विविध परीक्षांना वेळेत पोहोचता न आलेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठानं मोठा दिलासा दिला आहे. एमएससी सत्र २ आणि ४ ची प्रात्यक्षिक परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून एमए समाजशास्त्र सत्र ३ ची दुपारी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


विद्यापीठानं दिला दिलासा

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोमवारीही मुंबईकर अोलेचिंब झाले. जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबलं होतं. या पावसाचा मोठा फटका नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांनाही बसला. मुंबईची तुंबई झाल्यानं आज मुंबई विद्यापीठातल्या अनेक परीक्षांना वेळेवर पोहोचता आलं नाही. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली होती. परंतु विद्यापीठानं या विद्यार्थ्यांना दिलासा देत या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल, असं जाहीर केलं आहे.


एमएससी सत्र २ आणि ४ ची प्रात्यक्षिक परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे. तर एमए समाजशास्त्र सत्र ३ची दुपारी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
- विनोद माळाळे, उपकुलसचिव, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा -

शाळेतून 'छडी' होणार हद्दपार!

इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा