Advertisement

इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच


इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच
SHARES

सध्या सर्वत्र इंग्रजी भाषेचा सर्रास वापर केला जातो. विशेष म्हणजे इंग्रजी भाषा शिकल्यानं आपण जगातील कानाकोपऱ्यात एकमेकांशी जोडलं जातो. परंतु, मुंबईतल्या अनेकांना इंग्रजी भाषा सहजरित्या बोलता येत नाही, किंवा ती भाषा शिकण्यास कठीण आहे, असा समजही काही जणांचा झालेला पाहायला मिळतो. मात्र इंग्रजी भाषा जराही कठीण नसून तिला तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला ही भाषा नक्कीच शिकता येईल. 


'या' गोष्टी कराच

  • खरंतर इंग्रजीत भाषेत केवळ २६ मुळाक्षरं असून ती खूपच सुलभ रीतीनं वापरली जातात. विशेष म्हणजे मराठी किंवा इतर भाषेप्रमाणं यात जोडाक्षरं नसल्यानं ही भाषा तुम्हाला खूप लवकर आत्मसात करता येते.
  • सुरुवातीला कोणतीही भाषा शिकताना चुका होणं साहजिक आहे. परंतु, त्याच झालेल्या चुका वांरवार करणं टाळायला हवं. आणि त्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला आवडणारं एखादं पुस्तक किंवा वर्तमानपत्रातील तुमचा आवडता लेख वाचा.
  • कोणतीही गोष्ट एकाच दिवसात लगेचच येणं शक्य नसतं, त्यामुळे इंग्रजी भाषा शिकताना थोडासा संयम राखा, तसंच सुरुवातीला छोट्या-छोट्या आणि सोपी वाक्यरचना तयार करायला शिका.
  • आई-वडील, मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांसारखे इतर व्यक्ती इंग्रजीची वाक्य कशी बनवतात, त्यांचं इंग्रजीच उच्चार कसं आहेत याचं नियमित निरीक्षण करा. तसंच इंग्रजी शिकताना होणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठीही तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता.
  • दरदिवशी एक तरी नवीन शब्द शिका, त्या नवीन शब्दाचं आपल्या बोलण्यात समावेश करा. इंग्रजी बोलण्यासाठी नियमित सरावाची आवश्यकता असल्यानं स्वत:च मोठ्यानं इंग्रजीत बोला.
  • इंग्रजी शिकताना आपल्यासोबत एक पॉकेट डिक्शनरी ठेवा. एखादा नवीन शब्द ऐकल्यास किंवा वाचल्यास त्या शब्दाचा अर्थ डिक्शनरीत पाहून समजून घ्या.
  • इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळखली जात असली तरी देखील त्याचे उच्चार वेगवेगळ्या पद्धतीनं करण्यात येतात. त्यामुळे उगाचच ब्रिटीश, अमेरिकन, आफ्रिकन अॅक्सेंट दाखवण्यापेक्षा नैसर्गिक उच्चार करा.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा