Advertisement

शाळेतून 'छडी' होणार हद्दपार!


शाळेतून 'छडी' होणार हद्दपार!
SHARES

'छडी लागे छमछम, विद्या येई घमघम' असे संस्कार लहानपणी सर्वांवर झालेत. पण अाता शाळांमधील ही छडीच हद्दपार होणार अाहे. गेल्या काही दिवसांपासून शाळेत शिक्षकांनी मारलं म्हणून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करणं किंवा केलेल्या शिक्षेमुळं विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसणं अशा विविध घटना समोर येत अाहेत. त्यामुळे या सर्वांचा विचार करून शाळांमधली छडी वर्गाबाहेर ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानं घेतला आहे.


छडीमुळे मनावर विपरीत परिणाम

गेल्या काही दिवसांपासून 'छडी लागे छमछम, विद्या येई घम घम...' या बालगीतातील छडी वर्गात अवास्तव वाजू लागली आणि या शिक्षेचा मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ लागला होता. याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगानं घेतली आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो, यावर सविस्तर चर्चा केली. दरम्यान, या चर्चेनंतर वर्गातून छडी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


राग, भीती, दहशत

अशाप्रकारच्या शारीरिक शिक्षेमुळे निरागस विद्यार्थ्यांच्या मनात भीती, राग, दहशत निर्माण होते. तसेच अनेक प्रकरणांमध्ये आत्मविश्वासही कमी होतो. या सर्व परिणामांचा विचार करून शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिल्या जाऊ नयेत, अशी सूचना राष्ट्रीय बालहक्क आयोगनं केली आहे. या सूचनेनुसार तसेच शिक्षण हक्क कायदा, २००९ मधील अनुच्छेद १७ नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतदू करण्यात आली आहे.


मार्गदर्शक सूचना तयार

शालेय शिक्षण विभागानं शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणतीही शारीरिक इजा होईल अशी शिक्षा देऊ नये, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या सूचनांनुसार सर्व शाळांना कार्यवाही करणं बंधनकारक असेल. या सूचना सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, व्यवस्थापन यांना निदर्शनास आणून देण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन करावं, असंही शिक्षण विभागातर्फे शिक्षण संचालकांना कळविण्यात आलं आहे.


हेही वाचा -

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा