Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल


मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल
SHARES

लॉ शाखेच्या प्रॅक्टिकल परीक्षांचे पेपर नाकारणाऱ्या एका अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकलचे पेपर अखेर बुधवारी विद्यापीठानं स्वीकारले आहेत.  लॉ शाखेच्या अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकलचे पेपर स्विकारण्यास नकार देत असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 'मुंबई लाइव्ह' ने या विद्यार्थ्याची कैफियत मांडल्यावर या विद्यार्थ्याची दखल कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी घेतली.  


नेमकं प्रकरण काय ?

संतोष यादव हा अपंग विद्यार्थी एलएलएमच्या बिझनेस लॉ या ग्रुपमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत आहे. या विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना ७ मे रोजी एका विषयावर रिसर्च करून त्याचे पेपर मुंबई विद्यापीठाला द्यायचे होते. संतोषला हात नसल्याने त्यानं मोठ्या मेहनतीनं व हुशारीनं आपल्या दोन्ही पायांनी हा प्रोजेक्ट पूर्ण केला. मात्र, त्याला वेळेत हे पेपर सादर करता अाले नाहीत. तो १३ मे रोजी आपले रिसर्च पेपर घेऊन लाॅ विभागात देण्यासाठी गेला. मात्र, विद्यापीठाला पेपर देण्याची तारीख निघून गेली असल्यानं आम्ही हे रिसर्च पेपर घेणार नाही असं त्याला यावेळी सांगण्यात अालं. त्याने विनंती करूनही त्याचे पेपर घेतले नाहीत.

१४ मे रोजी त्यानं विद्यापीठाला एक पत्र लिहीत घडलेला प्रकार सांगितला. मात्र, विद्यापीठानेही या अपंग विद्यार्थ्याबाबत असंवदेनशीलता दाखवत आम्ही रिसर्च पेपर घेणार नाही अशी भूमिका कायम ठेवली आहे. यामुळे या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाईल याचीही लॉ विभागानं दखल घेतली नाही.


एका पत्राला लगेचच उत्तर

हा सर्व प्रकार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी संतोषला फोन करत त्याची समस्या विचारली. त्यांनी संतोषला विद्यापिठाला एक पत्र देण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने संतोषच्या समस्येची दखल घेण्यात अाली. एका दिवसात संतोषला न्याय देत त्याचे  प्रॅक्टिकलचे पेपरही स्विकारले.


मी बुधवारी ४ जुलैच्या सकाळी ९ च्या सुमारास मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये जाऊन पत्र देऊन आलो. तिथून घरी निघत असतानाच मला लॉ विभागातून फोन आला, आणि त्यांनी मला तुझे प्रॅक्टिकलचे पेपर घेऊन ये असं सांगितलं. मी प्रॅक्टिकलचे पेपर सादर केले असून खंरतर इतक्या लगेचच माझ्या पत्राच उत्तर मला मिळेल अशी मला अपेक्षा नव्हती. परंतु कुलगुरूंनी माझ्या समस्येची गंभीरपणे दखल घेतल्यानं मला १९ जुलैपासून सुरू होणाऱ्या तोंडी परिक्षेला बसता येणार आहे.
 - संतोष यादव, विद्यार्थी



हेही वाचा -

परीक्षा बुडालेल्या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा होणार

विद्यापिठाचा असंवदेनशील कारभार : अपंग विद्यार्थ्याचे प्रॅक्टिकल पेपर घेण्यास नकार



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा