Advertisement

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'

नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावीसाठी राज्य महामंडळाच्या १ लाख ११ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ३ हजार १८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तसंच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या ५ हजार ९२३ विद्यार्थ्यांचाही अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

बघा, 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरीट लिस्ट'
SHARES

अकरावी प्रवेशाची २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील पहिली गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या यादीत १ लाख २० हजार ५६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत वाणिज्य (कॉमर्स) शाखेकरीता सर्वाधिक १ लाख २९ हजार ५०६ अर्ज दाखल झाले असून त्यातील ७२ हजार ५४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. तसंच कला (आर्टस) शाखेसाठी १७ हजार ५८१ विद्यार्थ्यापैकी १२ हजार ६११ विद्यार्थ्यांना, तर विज्ञान (सायन्स) शाखेसाठी ५४ हजार ७१५ विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ८४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

परंतु यंदा अकरावी प्रवेशासाठी एमसीव्हीसीचे केवळ १ हजार ३१८ अर्ज सादर करण्यात आले असून त्यापैकी १ हजार ६३ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.


कुठल्या बोर्डाचे विद्यार्थी?

नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावीसाठी राज्य महामंडळाच्या १ लाख ११ हजार ४६१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून त्यापाठोपाठ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ३ हजार १८४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तसंच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या ५ हजार ९२३ विद्यार्थ्यांचाही अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे.


प्रवेशाची माहिती 'इथं' मिळेल

अकरावी प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी http://mumbai.11thadmission.net या वेबसाइटवरील Centralized Allocation Result 1 या ऑप्शनला क्लिक करून आपला अर्ज क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याला प्रवेश मिळालेल्या विद्यालयाची माहिती मिळेल. पहिली गुणवत्ता यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना येत्या ६ ते ९ जुलैदरम्यान आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.


पसंतीक्रमासाठी अट

त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश मिळाला नसेल त्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीची वाट पाहावी लागणार आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम बदलायचा असल्याच त्यांना तो बदलता येणार आहे. परंतु पसंतीक्रम बदल्यानंतर १० ते ११ जुलैपर्यंत त्याची प्रिंट काढावी लागणार आहे. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलले नसतील त्यांचे पूर्वीचेच पसंतीक्रम पुढील यादीसाठी ग्राह्य धरले जातील, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाकडून देण्यात आली आहे.


'असे' आहेत 'कटऑफ'

महाविद्यालयकला विज्ञानवाणिज्य
के.सी. कनिष्ठ महाविद्यालय, चर्चगेट.४२५ (९०.२० टक्के)४३६ (८७ टक्के)४४३ (८६ टक्के)
जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय, चर्चगेट.४४९ (८९.८ टक्के)४२९.१६ (८५.८३ टक्के)४५३.३३(९०.६६ टक्के)
एच. आर. कनिष्ठ महाविद्यालय, चर्चगेट.

४६० (९२ टक्के)
नरसी मोनजी कनिष्ठ महाविद्यालय.

४७१ (९४.२ टक्के)
मिठीबाई कनिष्ठ महाविद्यालय, विलेपार्ले.४३६ (८७.२ टक्के)४४२ (८८.४ टक्के)४५१.६७ (९०.३३ टक्के)
आर. ए. पोद्दार कनिष्ठ महाविद्यालय, माटुंगा.

वाणिज्य ४६५ (९३टक्के)
रुईया कनिष्ठ महाविद्यालय, माटुंगा. ४६१ (९२.२ टक्के)४६६ (९३.२ टक्के)
रुपारेल कनिष्ठ महाविद्यालय, माटुंगा.४३० (८६ टक्के)४५९ (९१.८ टक्के)४४८ (८९.६ टक्के)
वझे-केळकर कनिष्ठ महाविद्यालय, मुलुंड.४३४ (८६.८ टक्के)४६५ (९३ टक्के)४५४ (९०.८ टक्के)
सेंट झेविअर्स कनिष्ठ महाविद्यालय, फोर्ट.४७१ (९४.०२ टक्के)४५२ (९०.०४ टक्के)
हिंदुजा कनिष्ठ महाविद्यालय, चर्नी रोड.३७१ (७४.२ टक्के)४३५ (८७ टक्के)४४६ (८९.२ टक्के)



हेही वाचा-

यंदाही प्रवेशाचा गोंधळ होणार?

बीएससी सेमिस्टर ६चा निकाल जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा