Advertisement

बीएससी सेमिस्टर ६चा निकाल जाहीर


बीएससी सेमिस्टर ६चा निकाल जाहीर
SHARES

मुंबई विद्यापीठानं एप्रिल-मे २०१८ मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीएससी सेमिस्टर पाच व सहा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. बीएससी सेमिस्टर सहाच्या परीक्षेत १७ हजार ५०७ विद्यार्थी बसले होते. यातील ९ हजार ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या परीक्षेचा एकूण निकाल ५२.७९ टक्के लागला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील पदवी परीक्षांमधील हा पहिला निकाल विद्यापीठानं जाहीर केला आहे.

दरम्यान आतापर्यंत विद्यापीठानं बीएससी आयटी, बीएमएस, बी.फार्मसी यांसह अनेक ९० परीक्षांचे निकाल जाहीर केले असून यामुळे परदेशात व देशात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.



४२० विद्यार्थ्यांना अो ग्रेड

विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएस्सी सेमिस्टर ६ या परीक्षेकरिता एकूण १७,९०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर १७,५०८ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. दरम्यान या परीक्षेमध्ये ४२० विद्यार्थ्यांनी ओ (O)ग्रेड मिळविला असून ३ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी ऐ (A)ग्रेड प्राप्त केला आहे. तर बी 'B'विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ०९० इतकी आहे. त्याशिवाय बीएस्सी सेमिस्टर पाच या परीक्षेचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेकरिता ७ हजार २६० विद्यार्थी परीक्षेस बसले असून यातील ३ हजार ३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. ही परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती.


बीएससी सेमिस्टर ५ आणि ६ या दोन्ही परीक्षांचे निकाल विद्यापीठानं महाविद्यालयाच्या सहाय्याने करण्यात आल असून पदवी परीक्षांसही इतर सर्व निकालांकडे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी प्रत्यक्ष लक्ष दिल आहे. दरदिवशी परीक्षा विभागात तपासणी करण्यात आलेले पेपर व लागलेले निकाल यांच्या आढावा ते स्वत घेत आहेत. यासोबतच तृतीय वर्ष बीएच्या सत्र ६ चे मुल्यांकन ९८% पूर्ण झाले असून बी.कॉम सत्र-६ चे मुल्यांकनही ९६% पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात बी.ए आणि बी कॉम परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येतील.
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ


हेही वाचा - 

खड्डयात कोल्डमिक्सऐवजी चक्क पेव्हरब्लॉक

अंधेरी पुलाच्या दुघर्टनेचं खापर भाजपानं फोडलं पालिकेवर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा