मुंबई उच्च न्यायालयात ३१ ऑगस्टपर्यंत फक्त तातडीच्या सुनावणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई उच्च न्यायालय दिवाणी आणि फौजदारी प्रकारांतील अत्यंत तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठीच कार्यरत ठेवण्याचे आदेश ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचं नियमित कमकाज ३१ ऑगस्टपर्यंत सुरु होणार नाही.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं सध्या सर्व दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांत दिलेले अंतरीम आदेश, अटकेपासूनचे दिलासे हे आता ३१ ऑगस्टपर्यंत कायम राहतील, असे निर्देश मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं जारी केले आहेत.

 हे आदेश मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर, औरंगाबाद खंडपीठासह गोवा हायकोर्टालाही  राहतील.  राज्यात कोरोनाच्या फैलावामुळे हे आदेश आधी १५ एप्रिल त्यानंतर १५ जून मग १५ जुलै आणि आता थेट ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. सध्या हायकोर्टात ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून फक्त तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेणं सुरु आहे.


हेही वाचा

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

दिवसभरात ५५२७ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के


पुढील बातमी
इतर बातम्या