Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

यातील एकावर हत्येचा प्रयत्न तर दुसऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून त्या आरोपींचा शोध घेत आहेत.

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन
SHARES

राज्याच्या कारागृहांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवेसंदिवस वाढू लागला आहे.  काही दिवसांपूर्वी राज्यातील ५९६ तर मुंबईतील १८१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.  कोरोनाबाधित कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असताना. शिवाजीनगरमध्ये कोरोना पॉझीटीव्ह कैदीच पळून गेल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली आहे. संतोष मेहराज तिवरेकर(२०) व इरफान शकीर अली खान(१९) अशी या दोघांची नावे आहेत. यातील एकावर हत्येचा प्रयत्न तर दुसऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून त्या आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचाः- फोर्ट परीसरात ५ मजली इमारत कोसळली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिवरेकर आरोपीने एका व्यक्तीवर पूर्व वैमन्यसातून प्राणघातक हल्ला केला होता. त्याला पोलिसांनी २९ जूनला अटक केली होती.  तर दुसरा आरोपी खान याने अप्लवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्याला पोलिसांनी १ जुलैला अटक केली होती. पोलिसांच्याताब्यात असतानाच  गेल्या आठवड्यात आरोपी संतोष आणि  इरफानमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यानुसार त्यांना डाँक्टरांच्या सल्ल्यानुसार गोवंडी येथील शिवाजी नगरमधील कोविड सेंटरच्या ६०२ क्रमांकाच्या विलगीकरण खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीला ठेवले होते. त्यांच्यावर पाठत ठेवण्यासाठी दोन सुरक्षा रक्षकही होते. मात्र त्यांना कोविड सेंटरच्या बाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे काही तासासाठी का होईना ते पोलिसांच्या नजरे आड होते. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी पळण्याचा कट आखला. या दोघांनी १३ जुलैच्या मध्यरात्री त्याच्या खोलीचा दरवाजाची कडी तोडून पळ काढला. ते इतक्या सावध रित्या तेथून  पळून गेले त्याची कल्पना त्या आरोपीच्या खोलीतील तिसऱ्या व्यक्तीलाही आली नाही.

हेही वाचाः- मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटींग

दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळी आरोपींना नाश्ता देण्यासाठी तेथील कर्मचारी आले. त्यावेळी त्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी वेळीत सुरक्षा रक्षकांना हीबाबत सांगितल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. आधीच ते सराईत आरोपी त्यात कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण असल्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली. त्या दोघांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा