पश्चिम रेल्वेने (WR) मुंबईतील विविध स्थानकांवर प्रवाशांकडून 50 हून अधिक प्लास्टिकचे ड्रम जप्त केले आहेत.
वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरी सारख्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने मोठ्या आकाराच्या विनाबुकिंग सामानावर कारवाई सुरू केली आहे.
गर्दी आणि सामानाच्या नियमांचे उल्लंघन यामुळे होणारी अनागोंदी या घटनेमुळे अधोरेखित झाली. सुरक्षित वातावरण निर्माण करणे, आपात्कालीन घटनांचा धोका कमी करणे आणि सामान्य कोच प्रवाशांसाठी बोर्डिंग प्रक्रिया सुव्यवस्थित करणे हे या कारवाईमागचे उद्दिष्ट आहे.
एसी 3-टियर, एसी चेअर कार आणि नॉन-एसी स्लीपर क्लासमध्ये 40 किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी आहे. तर द्वितीय श्रेणीत 35 किलो वजनाचे सामान नेण्याची परवानगी आहे.
स्कूटर आणि सायकलींसह मोठ्या वस्तू मोफत भत्त्यात पात्र ठरत नाहीत, असेही रेल्वेने स्पष्ट केले. 100 cm x 100 cm x 70 cm च्या आकारमानापेक्षा जास्त वस्तूंसाठी प्रवाशांना दंडाला सामोरे जावे लागेल, असेही रेल्वेने स्पष्ट केले.
स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत तात्पुरती स्थगित केली आहे.
रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) द्वारे नवीन प्रणाली लागू केली जाईल. जी खात्री करेल की केवळ तिकीट असलेल्या प्रवाशांना त्यांची ट्रेन येणार आहे तेव्हा त्यांना प्लॅटफॉर्मवर येण्यास परवानगी दिली जाईल. या व्यवस्थेचा मूळ उद्देश प्लॅटफॉर्मवरील गर्दीला आळा घालणे हा आहे.
हेही वाचा