कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं प्रवाशांचा एसटीनं प्रवास कमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एसटी महामंडळान रेड झोन वगळता इतर झोनमध्ये जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरू केली आहे. या एसटी बस सेवेला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं २२ ते २६ मेपर्यंत ९३ हजार प्रवाशांनीच प्रवास केला आहे. राज्यांर्तगत एसटी प्रवासाचा प्रश्न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही.

कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. २२ मेपासून जिल्हाअंतर्गत एसटी चालविली जात आहे. परंतु, लग्नकार्य, यात्रा-जत्रा या सर्वावर बंदी असल्यानं तो प्रवासी वर्ग कमी झाला आहे. तसंच, ग्रामीण भागांमध्ये शेतीच्या मशागतीचं कामही सुरू असल्यानं बहुतेक लोक त्यातही गुंतली आहेत. परिणामी जिल्हांतर्गत प्रवास कमीच होत आहे.

२६ मेपर्यंत ३ हजार ११८ बस गाड्यांच्या १४ हजार २८२ फेऱ्या झाल्या. यातून ९३ हजार ३९३ प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी येथून ३२ हजार ७२१ प्रवाशांनी प्रवास केला. पाठोपाठ नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा येथून १७ हजार ८०५ आणि अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ येथून १५ हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास आहे.

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरमधून आतापर्यंत ९ हजार २४४ प्रवाशांनी एसटीचा पर्याय स्वीकारला. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्हा, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगरममधून अत्यंत कमी प्रवाशांनी प्रवास केल्याचंसमजतं.


हेही वाचा -

राज्यात मान्सून ८ जूनपर्यंत दाखल होणार

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या