Advertisement

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय


कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात १५० खाटांचं कोरोना रुग्णालय
SHARES

मुंबईतील कांदिवलीच्या कामगार रुग्णालयातही १५० खाटांचं कोरोना रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये १० खाटांचा अतिदक्षता विभागही असणार आहे. मुंबईत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या खाटांमुळं कामगार रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. पालिकेच्या नायर, सेव्हनहिल्स, कस्तुरबा, सेंट जॉर्ज आणि जीटी या ५ रुग्णालयांत कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. 

कांदिवलीच्या कामगार रुग्णालयात ३०० खाटांची क्षमता आहे. काही महिन्यांपूर्वी मरोळ येथील कामगार रुग्णालयाला आग लागल्यानंतर तेथील सर्व कर्मचारी सध्या या रुग्णालयात कार्यरत आहेत. यातील ६७ खाटा कोरोनाबाधित कामगारांसाठी रुग्णालयाने राखीव ठेवलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पालिकेने येथे ६३ खाटा करोना रुग्णांसाठी सुरू केलेल्या आहेत. याची संख्या वाढवून १५० पर्यत नेण्याचा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला आहे. पालिकेचे अधिकारी आणि राज्य कामगार विभागाचे अधिकारी यांनी गुरुवारी रुग्णालयाची पाहणी करून पुढील नियोजन केले.

राज्य कामगार रुग्णालयांमध्ये सध्या कांदिवली इथं कोरोना उपचाराची सुविधा असल्यान वरळी, मुलुंड अन्य रुग्णालयातून रुग्ण येथे पाठविले जातात. महापालिकेच्या ६३ खाटांपैकी २२ खाटांना ऑक्सीजनची सुविधा आहे. आणखी ८७ खाटा लवकरच उभारल्या जाणार असून सर्व खाटांना ऑक्सीजनची सुविधा सुरु केली जाणार आहे. तसंच १० खाटांचा अतिदक्षता विभागही सुरू करण्यात येणार आहे.हेही वाचा -

मुंबईत 'टोळ' की अफवांची टोळी? खरं की खोटं जाणून घ्या फॅक्ट चेक

आणखी एका शिपायाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यूसंबंधित विषय
Advertisement