Advertisement

मुंबईत 'टोळ' की अफवांची टोळी? खरं की खोटं जाणून घ्या फॅक्ट चेक

मुंबईतल्या अनेक भागांत टोळ (Locusts Attack) किटकांच्या झुंड दिसून अल्याचा दावा अनेकांनी केला आहे. पण हे खरे की खोटे जाणून घ्या मुंबई लाइव्हनं केलेल्या फॅक्ट चेकमधून.

मुंबईत 'टोळ' की अफवांची टोळी? खरं की खोटं जाणून घ्या फॅक्ट चेक
SHARES
Advertisement

साऱ्या जगात कोरोना व्हायरसनं थैमान घातला आहे. भारतासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळत आहेत. एक संकट कमी होतं की काय ते आता भारतावर आणखी एक संकट येऊन ठेपलंय. हे संकट म्हणजे टोळ धाड... अनेक राज्यांना विळखा घातलाय तो टोळधाडीच्या अस्मानी संकटानं!


'या' ५ राज्यात शिरकाव

११ एप्रिलला या थव्यानं राजस्थानात प्रवेश केला आणि आतापर्यंत राजस्थान आणि महाराष्ट्रासह‌ पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश अशा ५ राज्यात तो पोहचलाय. पूर्व महाराष्ट्रातल्या काही गावांना या टोळधाडीचा फटका बसला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात टोळांचा उपद्रव दिसून येतोय. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये टोळ किटकांच्या झुंडच्या झुंड दिसून आले आहेत, असा दावा करण्यात येत आहे.

अफवांची 'टोळी'?

आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात दिसणारे टोळांचे आगमन मुंबईत देखील झाला असल्याचा दावा अनेकांनीा केला. मुंबईतल्या (Locusts Attack) अनेक भागात ‘टोळ’ धाड झाली आहे याचे मेसेजेस, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. ट्विटरवर अनेकांनी व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. पण हे व्हिडिओ किती खरे आहेत याची पडताळणी अजून होऊ शकली नाही.


करूया पडताळणी... 


१) 

अलर्ट सिटिजन या पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सोबतच यात एक मेसेज देखील लिहला आहे. इर्स्टन एक्स्प्रेस हायवे इथल्या गोदरेड प्लॅटिनम जवळ टोळ दिसले, असा दावा त्यात करण्यात आला आहे. यासोबतच वांद्रे, गोरेगाव आणि अंधेरी इथल्या नागरिकांना खिडक्या बंद ठेवण्यास सांगितलं आहे. झाडं असतील तर नेट किंवा साडीनं झाकून ठेवण्यास सांगितलं आहे.

पण अनेकांनी वरील व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. या व्हिडिओत उडणारे टोळ नसून मधमाश्या असल्याच्या दावा देखील अनेकांनी केला आहे.


२)

एका युजरनं मुंबईमध्ये स्वागत आहे असं म्हणत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो कुठल्या परिसरातील आहे याची माहिती मिळू शकली नाही.


३)

तर राजन नावाच्या युजरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओत टोळला एका पिशवीत पकडून ठेवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ गोरेगावचा असून राजन यांच्या मित्रानं शूट केल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


४) 

नितू चंद्रा श्रीवास्तव यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात खिडकी बाहेर काही उडताना दिसत आहे. त्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या आंटीच्या घराबाहेर टोळ उडताना दिसले. सोबतच कोलाबा परिसरातील हा व्हिडिओ असल्याचं त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पण हा व्हिडिओ किती खरा खोटा हे अद्याप समजू शकलं नाही. अनेक युजर्सनी हा व्हिडिओ खोटो असल्याचा म्हटलं आहे. अनेकांचं म्हणणं होतं की, व्हिडिओत दिसणारे टोळ नाहीत. टोळ आकारानं एवढे लहान नसतात. त्यांचा आकार थोडा मोठा असतो. काही जणांनी त्यांनी कोलाबाच्या लिहलेल्या चुकिच्या स्पेलिंगवर बोट ठेवत म्हटलं की, हा व्हिडिओ मुंबईचा नाही.

काहींनी हा व्हिडिओ सांताक्रुझचा आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे नेमका परिसर कुठला यावरून संभ्रम आहेच. शिवाय व्हिडिओत दिसत आहेत ते टोळच आहेत की नाही यावरून देखील शंकाच आहे. कारण टोळचा आकार थोडा मोठा असतो.   


६)

तर अनेकांनी आपल्या घरातल्या बाल्कनीत एक टोळ आल्याचा फोटो शेअर केला आहे. एका युजरनं असाच फोटो शेअर केला आहे. हा फोटो मुलुंडच्या लिंक रोड इथला आहे.

 यावर एका युजर्सनं लिहलं आहे की, १-२ टोळ जर दिसले तर घाबरण्याचं कारण नाही. १-२ टोळ दिसणं हे सामान्य आहे. जर टोळ झुंडित असतील तर मोठी गोष्ट आहे. त्यामुळे लोकांमध्ये उगाच भिती पसरवू नका.


७) 

तर लोखंडवाला ओशीवरा सिटिझन असोशिएशननं यावर एक मेसेज ट्विटरवर शेअर केला आहे की, उगाच भितीचं वातावरण पसरवू नका. एक टोळ दिसला तर त्याचा संबंध टोळ धाडशी लावू नका. याला टोळ धाड अजिबात म्हणत नाही. १७ वर्षानंतर टोळ धाड महाराष्ट्रात झाली आहे. पण मुंबईत अजून त्यांनी शिरकाव केला नाही.


८) मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे स्पष्टीकरण

तर मुंबईतल्या काही भागात टोळ दिसल्याच्या दाव्यानंतर मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पण अशी परिस्थिती नाही की विमान सेवेवर याचा परिणाम होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे व्यवस्थापक राजीव मेहरा म्हणाले की, सध्या आम्हाला एकही टोळ किटकांची झुंड दिसली नाही. तरी आम्ही सतर्क आहोत.
संबंधित विषय
Advertisement