आणखी एका शिपायाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू

पोलिसांमध्ये एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या 2095 व मृत्यूंची संख्या 22 झाली आहे. यातील 897 पोलीस या आजारातून बरे झाले आहेत.

आणखी एका शिपायाचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू
SHARES
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण प्रशासन या लढाईत कोरोनावर विजय मिळवण्यासाठी एकवटले आहे. मात्र कधी कधी दुर्दैवाने या लढाईमध्ये अशा काही महत्वाच्या लोकांना मुकावे लागत आहे. अशाच या लढाईत मालवणी पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलचा गुरूवारी मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. 

कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असताना, नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान, लोकांनी सामाजिक अंतर पाळावे व जास्तीत जास्त शक्यतो घरी रहावे असे आवाहन केले गेले आहे. मात्र या साथीच्या सुरुवातीपासूनच पोलीस असो की डॉक्टर हे लोक नेहमीच फ्रंटलाईनवर लढत आले आहेत. आज, गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक पोलिस अधिकारी या प्राणघातक विषाणूपासून मुक्त झाले असले तरी, दुर्दैवाने मालवणीतील हेड काँन्स्टेबल  यांचे निधन झाले. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिल्यावर, सोशल मिडियावर अनेकांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस रात्रंदिवस एक करुन जनतेची सेवा करत आहे. कोरोनासह त्यांचे मोठे युद्ध सुरु असून हे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कोविड योद्धांनाही कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र पोलिसांमध्ये एकूण कोरोना संक्रमित लोकांची संख्या 2095 व मृत्यूंची संख्या 22 झाली आहे. यातील 897 पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. या कोरोना बाधीतांमध्ये मुंबई पोलिस दलातील शिपायांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई पोलिस दलातील 1266 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 400 हून अधिक पोलिस कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा