मीरा-भाईंदरमध्ये दुकानं सम-विषम पद्धतीने उघडण्याची परवानगी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

 मिरा-भाईंदरमध्ये दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने लाॅकडाऊन लागू केला आहे. मात्र, लाॅकडाऊनला राजकीय नेते आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेने लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत.

मिरा-भाईंदरमधील दुकाने आता सम-विषम पद्धतीने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. अतिसंक्रमित विभागातील दुकाने मात्र यामधून वगळण्यात आली आहेत. अतिसंक्रमित विभागातील दुकाने वगळून इतर भागातील दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्याची मुभा देण्यात आली असल्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी काढले आहे. त्यामुळे  नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये १ जुलै ते १० जुलैपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, महापालिका आयुक्तांनी पुन्हा १८ जुलैपर्यंत लाॅकडाऊनची मुदत वाढविली होती. त्यामुळे  नागरिक आणि व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. नागरिकांच्या नाराजीमुळे राजकीय नेत्यांनीदेखील हस्तक्षेप केल्याने नव्या वादाला सुरुवात झाली होती. यामुळे महापालिकेने सरसकट लाॅकडाऊन हटवून केवळ अतिसंक्रमित क्षेत्रांपुरतेच कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे शहरांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सम-विषम पद्धतीनुसार सुरू राहणार आहेत.

येथील दुकानं बंद

भाईंदर पूर्व : सरस्वती नगर, साईबाबा नगर बी पी रोड,  खारी गाव, आरएनपी पार्क, सेना नगर, शिर्डी नगर


हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या