Advertisement

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

कोरोना संशयीत मृत्यू असं म्हणत मुंबई महापालिका कोरोनाबाधित मृत्यूची संख्या लपवत आहे. त्यामुळे महापालिकेने ताबडतोब ‘कोविड १९ संशयित मृत्यू’ म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करावं, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महापालिकेकडे केली आहे.

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न
SHARES

कोरोना संशयीत मृत्यू असं म्हणत मुंबई महापालिका कोरोनाबाधित मृत्यूची संख्या लपवत आहे. त्यामुळे महापालिकेने ताबडतोब ‘कोविड १९ संशयित मृत्यू’ म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट करावं, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महापालिकेकडे केली आहे. (bjp mla nitesh rane demand ward wise covid 19 death count from mumbai bmc)

नितेश राणे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, ‘संशयित कोरोना मृत्यू’ यावर मुंबई महापालिकेने योग्य प्रकारे स्पष्टीकरण द्यावं. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे खरे आकडे लपवण्याची ही मोठी शक्कल आहे. ‘संशयित कोरोना मृत्यू’ च्या नावाखाली अनेक कोरोना मृत्यू लपवत महापालिका मृत्यूचा दर खाली गेल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. बीएमसी ही पूर्णपणे गोलमाल गँग आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा - Coronavirus Pandemic : राज्यात ९५१८ नवे रुग्ण, २५८ जणांचा दिवसभरात मृत्यू

शिवाय नितेश राणे यांनी कोरोनामुळे मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांची वाॅर्डनिहाय माहिती देखील महापालिकेकडून मागितली आहे. यासंदर्भातील माहिती उपलब्ध न झाल्याने नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, कोरोनाशी लढा देत असताना अनेक रुग्ण दगावले आहे. याबाबत मी मुंबई महापालिका आयुक्तांना १९ जुलै रोजी पत्राद्वारे माहिती मागितली असता अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

तरी आपण मला मुंबईत कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची वाॅर्डनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. 

दरम्यान रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने राज्यात ३ लाखांचा टप्पा पार केला असून त्यातील १ लाखांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत आतापर्यंत ५७१४ मृत्यू झाले असून राज्यात आतापर्यंत ११,८५४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून भाजप नेत्यांकडून सातत्याने महापालिका कोरोनाबाधित मृत्यूचे आकडे लवपत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

हेही वाचा - मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा