Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कमी होणाऱ्या कोरोना चाचण्यांकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे.

मुंबईत दररोज फक्त ४ हजार चाचण्या, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कमी होणाऱ्या कोरोना चाचण्यांकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (average only 4 thousand corona test done in mumbai alleges bjp leader devendra fadnavis) पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून फडणवीस यांनी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना १ जुलै २०२० रोजी पत्र पाठवून मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्याचा आग्रह धरला आहे. राज्यांकडे असलेल्या चाचण्याच्या क्षमतेचा वापर होत नसल्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. मुंबईत १ जून रोजी २,०१,५०७ चाचण्या झाल्या होत्या. ती संख्या ३० जून रोजी ३, ३३,७५२ इतकी झाली. याचा अर्थ जून महिन्यात मुंबईत १,३२,२४५ चाचण्या झाल्या आहेत. म्हणजेच मुंबईत दररोज सरासरी ४४०८ इतक्या चाचण्या झाल्या आहेत. यातील पुन्हा होणाऱ्या चाचण्यांची संख्या वजा केली तर दररोज ४ हजार चाचण्या होत आहेत. या १,३२,२४५ चाचण्यांपैकी ३६,५५९ चाचण्या पाॅझिटिव्ह आल्या आहेत. याचाच अर्थ मुंबईत संसर्गाचं प्रमाण २८ टक्के (प्रति १०० माणसांमागे २८ जण) इतकं आहे. देशाच्या तुलनेत हा दर कितीतरी अधिक आहे. देशात २९ जूनपर्यंत ८६,०८, ६५४ चाचण्या झाल्या होत्या. त्यात ५,४९,९४६ रुग्णसंख्या होती. हा दर ६.३९ टक्के इतका आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिलं.

२५ जून रोजी महाराष्ट्रात प्रथमच चाचण्यांची संख्या २४ हजारांवर नेण्यात आली. त्या दिवशी ४८४१ रुग्ण आढळताच दुसऱ्या दिवशी चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली. २८ जून रोजी २६,६२८ चाचण्यांमधून ५४९३ रुग्ण आढळताच दुसऱ्या दिवशी १९, ९८३ चाचण्या करण्यात आल्या. अशा नियंत्रीत चाचण्यांतून रुग्णांची संख्या कमी-अधिक करता येईल, परंतु संसर्ग वाढण्याचा धोका यापेक्षा मोठा आहे. 

 हेही वाचा - मुंबईतील कोरोनाबळींची संख्या लपवली जात आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबईतील आतापर्यंत एकूण ४५५६ मृत्यूंपैकी एकट्या जून महिन्यात ३२७७ मृत्यू दाखवण्यात आले आहेत. यातील काही मृत्यू भलेही आधीचे असतील, पण त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर काढणं हे अतिशय जिकरीचं काम बनलं आहे. योग्य आकडेवारी नसेल, तर प्रशासनाला कोरोनाविरूद्ध उपाययोजनांची दिशा आखणं कठीण होऊन बसेल. महाराष्ट्रात दररोज जवळपास २०० च्या आसापास मृत्यूसंख्या दाखवण्यात येते. त्यातील ७० ते ८० मृत्यू हे ४८ तासांतील दाखवण्यात येतात आणि १२० मृत्यू हे त्यापूर्वीचे म्हणून दाखवले जातात. 

मृत्यूसंख्येची फेरपडताळणी लगेच पूर्ण केली पाहिजे आणि रोजचे मृत्यू रोज दाखवले पाहिजे, अशी व्यवस्था तातडीने उभारली पाहिजे. मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले मृत्यू एकदा पूर्णपणे जाहीर केले पाहिजे. त्याशिवाय कोविड विरोधात रणनिती आखता येणार नाही. मुंबईतील रुग्णसंख्या जून महिन्यात ९४ टक्के, ठाण्यात १६६ टक्के, कल्याण-डोंबिवलीत ४६९ टक्के, मिरा-भाईंदरमध्ये ४१३ टक्के, भिवंडीत १४७० टक्के, पनवेलमध्ये ३६४ टक्के, नवी मुंबईत १९० टक्के इतकी वाढली असताना ही काळजी घेण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मृतदेहांची चाचणी न करण्याचा फटका आता कोरोना योद्ध्यांना देखील बसत आहे. ऐरोलीत बंदोबस्तावर असलेले मंगेश कांबळे यांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालयाने नियमावर बोट ठेवत त्यांची कोरोना चाचणी करण्यास नकार दिला. त्यांच्या पत्नीला लक्षणे असल्याने त्यांची चाचणी केल्यावर त्या कोरोना पाॅझिटिव्ह निघाल्या. पण कांबळे यांची चाचणी न झाल्याने काेरोनामृत्यू म्हणून त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत त्यांना मिळू शकणार नाही. मुंबईतील आरोग्यव्यवस्थेमुळे लक्षणे दिसली, तरी लोकं पुढे येण्यास घाबरतात आणि परिस्थिती गंभीर झाल्यावर की पुढे येतात. असं गृहित धरलं तरी त्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले की नाही हे कळण्यासाठी कोरोना चाचणी होणं खूप गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा