Advertisement

'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही: अमित साटम

न्यूयॉर्कच्या निकालानंतर भाजप नेते अमित साटम यांनी केलेल्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? आणि हे वक्तव्य काय आहे.

'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही: अमित साटम
SHARES

न्यूयॉर्क शहराच्या महापौर निवडणुकीत 34 वर्षीय झोहरान ममदानी यांच्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद आता थेट मुंबईत उमटताना दिसत आहेत.

न्यूयॉर्कचे प्रशासकीय प्रमुख बनणारे ममदानी हे गेल्या 100 वर्षांतील पहिले दक्षिण आशियाई, मुस्लिम आणि सर्वात तरुण महापौर ठरले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिकेची (BMC) निवडणूक तोंडावर आहे.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी या पार्श्वभूमीवर अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

सोशल मीडियावर 'खान'ला विरोध, 'व्होट जिहाद'चा आरोप

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "आम्ही कोणाही 'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही."

साटम यांनी ममदानी यांच्या विजयाचे उदाहरण देत याला 'व्होट जिहाद' म्हटले आहे. त्यांच्या मते, न्यूयॉर्क शहरात ज्या प्रकारचं राजकारण दिसलं, त्याच प्रकारचं राजकारण मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काय म्हणाले साटम?

अंधेरी पश्चिमचे आमदार आणि मुंबई भाजपचे प्रमुख अमीत साटम यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, "आम्ही कोणत्याही खानला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही." हे राजकारण 'व्होट जिहाद' (Vote Jihad) आहे.

न्यूयॉर्क शहरात जे राजकारण दिसले, तेच राजकारण मुंबईत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपल्या वक्तव्याचा नेमका अर्थ स्पष्ट करताना भाजप नेत्याने सांगितले की, "काही लोक राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तुष्टीकरणाचा (appeasement) मार्ग अवलंबत आहेत. यापूर्वी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा शक्तींपासून मुंबईचे संरक्षण करणे आवश्यक आहे."

धार्मिक सलोख्यावर विश्वास असल्याचे सांगत साटम पुढे म्हणाले, "जर कोणी राष्ट्रविरोधी भूमिका घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला आमचा विरोध असेल."



हेही वाचा

निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले

दुबार मतदारांना चाप बसणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा