दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचं लक्ष असणार आहे. निवडणूक आयोगाने यंत्रणेवर टूल विकसित केले आहे. या टूलद्वारे दुबार मतदारांची ओळख पटणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपवर मतदारांना त्यांचं नाव, मतदार केंद्र, उमेदवारविषयी माहिती मिळणार आहे. या अॅपवर उमेदवारांच्या गुन्हेगारी, शैक्षणिक, आर्थिक संपत्तीविषयी माहिती मिळू शकेल.
मतदार यादीत दुबार मतदारांबाबत आयोगाकडून पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांची नाव सहज समोर येतील.
निवडणूक आयोगाने सांगितले की, 'दुबार मतदारांशी निवडणूक आयोगाचे अधिकारी संपर्क करतील. जर दुबार मतदारांनी प्रतिसाद दिला नाही तर त्याचे एक नाव रद्द केले जाईल. तसंच ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत ते त्यांच्याकडून लिहून घेतले जाईल. दुबार मतदारांकडून घोषणापत्र लिहून घेतले जाईल.'
तसंच, 'डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही. दुबार मतदारांकडून एकाच मतदानाची हमी घेतली जाणार आहे. त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. दुसऱ्या मतदान केंद्रात त्यांना मतदान करता येणार नाही.', त्यामुळे एकाच वेळी दोन मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्यांना चाप बसणार आहे.