
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2 डिसेंबरला निवडणुका होणार तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहे.
10 नोव्हेंबर रोजी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर रोजी असणार आहे. उमेदवारांच्या यादीची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
तसेच 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान इच्छित उमेदवार माघारीचे अर्ज दाखल करू शकतात. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
राज्यातील पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये एकूण 86859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
246 नगर परिषदांमध्ये 10 नवनिर्वाचित नगरपरिषदांचा समावेश आहे. 236 नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे.
राज्यात एकूण 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 15 नवनिर्वाचित आहे.
तसेच 27 नगरपंतायतींची मुदत यापूर्वी संपलेली आहे. उर्वरित 105 नगरपंतायतींची मुदत समाप्त झालेली नाही.
नगर परिषदांची सदस्य संख्या ही 20 ते 75 आहे आणि नगर पंचायतची सदस्य संख्या ही 17 आहे.
नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्य पद्धतीने आहे. साधारण एका प्रभागामध्ये दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात. पण नगर परिषदेचा सदस्य संख्या विषम असेल तर एका प्रभागात तीन जागा असतात.
साधारणत: मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागेल. याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष राहील त्याच्यासाठी देखील मतदान करावं लागेल.
नगर पंचायतीमध्ये एक सदस्य आणि एक अध्यक्ष असतो. त्यामुळे तिथे मतदारांना 2 मते द्यावी लागतील. संभाव्य दुबार मतदारापुढे डबल स्टार केले जाईल.
नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाने (election committe) निर्माण केलेल्या संकेतस्थळावर स्वीकारले जातील. एका प्रभागाम्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील.
यासोबत जात वैधता प्रमाणपत्र आवश्यकता आहे. ज्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना अर्ज केल्याची पावती जमा करावी लागील.
जर असा उमेदवार (voters) निवडून आला तर त्याला निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र (caste certificate) देणं आवश्यक राहील.
नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदान केंद्र निहाय मतदान याद्या 7 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे.
अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी 5 लाख आणि अध्यक्ष पदासाठी 15 लाख, ब वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 11 लाख 25 हजार आणि सदस्य पदासाठी 3 लाख 50 हजार असणार आहे.
तसेच क वर्गासाठी अध्यक्ष पदासाठी 7 लाख 50 हजार आणि सदस्य पदासाठी 2 लाख 50 हजार, नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 6 लाख आणि सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार अशी खर्चाची मर्यादा आहे.
मतदारांसाठी जे संकेतस्थळ विकसित केली आहे त्यामध्ये सर्च फॅसिलिटी दिली आहे. त्यामध्ये मतदारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल.
मतदारांसाठी मोबाईल अॅप तयार केलं आहे. त्यामध्ये मतदार त्यांच्या उमेदवारांविषयी आणि इतर सर्व माहिती मिळेल.
हेही वाचा
