Advertisement

आपल्या निवडणुका आता निपक्ष राहिलेल्या नाहीत: आदित्य ठाकरे

शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींच्या व्होट चोरी आरोपाला पाठिंबा दिला.

आपल्या निवडणुका आता निपक्ष राहिलेल्या नाहीत: आदित्य ठाकरे
SHARES

शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या व्होट चोरी या गंभीर आरोपांना ठाम पाठिंबा दर्शवला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) फसवे प्रकार होऊ दिल्यामुळे देशातील लोकशाहीची पायाभरणी कमकुवत झाल्याचा आरोप केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले की, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगातील “फसवणूक” उघडकीस आणली आहे. ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतचोरीद्वारे विविध राज्यांवर ताबा मिळवणे शक्य झाले आहे. त्यांनी लिहिले की राहुल गांधी यांचे “व्होट चोरी” या विषयावरील सादरीकरण प्रत्येक भारतीयाने, आपल्या राजकीय विचारधारेशी संबंध नसतानाही, पाहायला हवे.  कारण हा विषय प्रत्येक नागरिकाच्या मताच्या मूल्याशी संबंधित आहे.

ठाकरे म्हणाले, “जग पाहत आहे की आता आपली निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिलेली नाही. हा मुद्दा राजकारणाचा किंवा विचारसरणीचा नाही, तर आपल्या मताच्या किमतीचा आहे. जेव्हा निवडणूक आयोग एका पक्षाला मतदार याद्यांवर बनावट मतदार ठेवू देतो, तेव्हा तुमच्या मताची किंमत शून्य होते.”

“कोण जिंकलं किंवा हरलं, हे महत्त्वाचं नाही प्रत्येक भारतीयाच्या मताला समान किंमत मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले. 

ठाकरे यांनी हेही स्मरण करून दिले की त्यांच्या पक्षाने नुकतेच वरळी आणि महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांमध्ये झालेल्या कथित मतदार फसवणुकीचे पुरावे सादर केले होते. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.

ठाकरे यांच्या मतांना पाठिंबा देत शिवसेना (UBT) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले की, पात्र मतदारांना काढून टाकणे आणि अपात्र लोकांना यादीत समाविष्ट करणे हा सिस्टिमॅटिक म्हणजेच संगठित प्रकार आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की भाजपाने लिहिलेली स्क्रिप्ट वाचण्याऐवजी त्यांनी शांतता तोडून स्वतंत्रपणे कारवाई करावी.

त्यांच्या या प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी हरियाणातील निवडणुकीत झालेल्या कथित व्होट चोरी बाबत भाजप आणि निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांनंतर आल्या आहेत. 

राहुल गांधी यांनी दावा केला की हरियाणाच्या निवडणुकीत तब्बल 25 लाख बनावट मते टाकण्यात आली आहे. प्रत्येक आठव्या मतदारांपैकी एक मतदार बनावट होता. त्यांनी हेही सांगितले की त्यांच्या टीमला 5.21 लाख डुप्लिकेट मतदार नोंदी सापडल्या आहेत, ज्यांपैकी काहींच्या फोटोंखाली वेगवेगळी नावे होती.



हेही वाचा

'खान'ला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही: अमित साटम

निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा