कर्नाटक निवडणूक होताच पेट्रोल-डिझेलचा भडका

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • सिविक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान होताच अपेक्षेनुसार देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांचा पुन्हा भडका उडाला आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर १७ पैशांची वाढ होऊन मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८२.६५ रुपयांवर जाऊन पोहोचले. तर डिझेलच्या दरांत प्रति लिटर २३ पैशांची वाढ होऊन मुंबईत डिझेल प्रति लिटर ७०.४३ रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

किती होते दर?

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर सोमवार सकाळ ६ वाजेपासून लागू करण्यात आले आहेत. इंडियन आॅइलच्या अधिकृत वेबसाईटवर हे नवीन दर टाकण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८२.४८ रुपये एवढे होते. तर डिझेलचे दर प्रति लिटर ७०.२० रुपये एवढे होते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

५०० कोटींचं नुकसान

कर्नाटक विधानसभा निवडणूक असल्याने केंद्र सरकारने या किंमतीवर काही दिवसांपुरता लगाम घातला होता. त्यानंतर तब्बल १९ दिवसांनंतर या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. कर्नाटकात १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही देशात पेट्रोलियम कंपन्यांनी न केलेल्या दरवाढीमुळे कंपन्यांचं किमान ५०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे.

केंद्र सरकारने जून २०१० मध्ये पेट्रोलच्या किंमती नियंत्रणमुक्त केल्या होत्या. तर आॅक्टोबर २०१४ मध्ये डिझेलच्या किंमतीही नियंत्रणमुक्त केल्या होत्या.


हेही वाचा-

२०० अन् २००० च्या नोटा जीवापाड जपा, नाहीतर...


पुढील बातमी
इतर बातम्या