२०० अन् २००० च्या नोटा जीवापाड जपा, नाहीतर...

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या 'नोट रिफंड' अर्थात नोटा बदलून देण्याच्या नियमांतर्गत जुन्या, फाटलेल्या नोटा बदलून देण्यात येतात. या नियमांत नुकतेच बदल करण्यात आले असून या नियमांमध्ये २०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नोटा खराब झाल्या वा फाटल्या तर त्या बँकेत जमा करता येणार नाही. त्यामुळे २०० आणि २००० च्या नोटांना जीवापाड जपावं लागणार हे नक्की.

  • २०० अन् २००० च्या नोटा जीवापाड जपा, नाहीतर...
SHARE

अनेकांना नोटा कशाही, कुठेही कोंबून ठेवण्याची सवय असते. पण ही सवय अनेकांना महागात पडू शकते. कारण चलनात असलेल्या नोटांपैकी २०० आणि २००० च्या नोटा खराब झाल्या वा फाटल्या तर या नोटा तुम्हाला बँकेत जमाही करता येणार नाही किंवा बदलूनही मिळणार नाही. यामुळे होणारं नुकसान तुम्हाला सहन करावं लागू शकतं.

कारण काय?

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या 'नोट रिफंड' अर्थात नोटा बदलून देण्याच्या नियमांतर्गत जुन्या, फाटलेल्या नोटा बदलून देण्यात येतात. या नियमांत नुकतेच बदल करण्यात आले असून या नियमांमध्ये २०० आणि २००० रुपयांच्या नोटांचा समावेशच करण्यात आलेला नाही. त्यामुळे या नोटा खराब झाल्या वा फाटल्या तर त्या बँकेत जमा करता येणार नाही. त्यामुळे २०० आणि २००० च्या नोटांना जीवापाड जपावं लागणार हे नक्की.

कुठल्या नोटांचा समावेश?

नोट रिफंड नियमामध्ये ५०, १०, ५०, १००, ५००, १०००, ५००० आणि १०,००० रुपयांचा चलनी नोटांचा समावेश आहे. मात्र आरबीयानं चलनात आणलेल्या २०० आणि २००० च्या नोटांचा मात्र यात समावेश नाही. ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून नोटाबंदी लागू झाल्यानंतर २००० रुपयांची नवी नोट चलनात आली. त्यापोठोपाठ आॅगस्ट २०० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती.नोटांची छपाई बंद

सध्या २००० च्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. तर फाटलेल्या अथवा खबार नोटांच्या तक्रारी कमी आहेत. पण असलं तरी वापरात असलेल्या नोटा खराब झाल्या वा फाटल्या तर ते ग्राहकांना महागात पडू शकतं हे मात्र नक्की.

बँकांमध्ये नाराजी

या तरतुदींमध्ये बदल करण्याची मागणी बँकांकडून होत आहे. तशी लेखी मागणी याआधीच बँकांकडून करण्यात आली आहे. मात्र अजूनही आरबीआयनं याकडे लक्ष दिलेलं नसल्यानं बँकांमध्ये याबाबत नाराजी आहे.

आर्थिक प्रकरणांचे सचिव सुभाष गर्ग म्हणाले की, २००० च्या ६.७० लाख कोटी रुपयांच्या नोटा सध्या चलनात आहेत. त्यामुळे आरबीआयने नवीन नोटा छापण्याचं बंद केलं आहे. हेही वाचा-

आता फ्लिपकार्ट बदलणार? वॉलमार्टनं खरेदी केले शेअर्स!

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?संबंधित विषय
ताज्या बातम्या