Advertisement

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच त्यांचा मुलगा आकाश अंबानीचा थाटामाटात साखरपुडा पार पडल्यानंतर आता अंबानी घरातली एकलुती एक मुलगी इशा अंबानी हिचाही साखरपुडा पार पडल्याची जोरदार चर्चा आहे.

अंबानींच्या मुलीला मंदिरात केलं प्रपोज! डिसेंबरमध्ये होणार लग्न?
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकताच त्यांचा मुलगा आकाश अंबानीचा थाटामाटात साखरपुडा पार पडल्यानंतर आता अंबानी घरातली एकलुती एक मुलगी इशा अंबानी हिचाही साखरपुडा पार पडल्याची जोरदार चर्चा आहे. उद्योगपती अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल याच्याबरोबर इशाचा साखरपुडा झाला असून येत्या डिसेंबरमध्ये हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.



आनंदसाठी मुकेश अंबानी प्रेरणास्थान!

आनंद हा इशाचा जुना मित्र असून अंबानी आणि पिरामल कुटुंबाचे जुने ४० वर्षांचे स्नेहसंबंध असल्याचीही माहिती समोर येत आहे. आनंद हा हार्वर्ड बिजनेस स्कूलमधून ग्रॅज्युएट झाला असून सध्या तो पिरामल एंटरप्रायझेसमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम पाहात आहे. आनंद याआधी इंडियन मर्चंट्स चेंबर-यूथ विंगचा युवा अध्यक्ष राहिला आहे. तर आनंद नेहमीच मुकेश अंबानी यांनाच प्रेरणास्थान मानत असून याचा उल्लेख त्याने अनेक कार्यक्रमांमध्ये केला आहे.



महाबळेश्वरला केलं प्रपोज

आनंदने इशाला महाबळेश्वर येथील एका मंदिरात प्रपोज केलं होतं. इशानं आनंदला होकार दिल्यानंतर दोघांनी आपापल्या घरी सांगितल्यावर दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडल्याची माहिती समोर येत आहे. तर लग्नासाठी डिसेंबरचा मुहूर्त काढण्यात आल्याचंही समजत आहे. त्यामुळे अंबानींच्या अँटिलिया हाऊसमध्ये आकाश आणि इशाच्या लग्नाची घाई सुरू असणार हे नक्की!



हेही वाचा

होणार सून मी अंबानींच्या घरची


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा