Advertisement

होणार सून मी अंबानींच्या घरची

आकाश अंबानीच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा देखील होणार आहे. आणि याच वर्षाच्या अखेरपर्यंत हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. या प्री-एंगेजमेंट सोहळ्याचे फोटो आकाश अंबानीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

होणार सून मी अंबानींच्या घरची
SHARES

अब्जधीश मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीचं लग्न श्लोका मेहता हिच्यासोबत ठरलं आहे. या दोघांचा प्री-एंगेजमेंट सोहळा शनिवारी गोव्यातील पाल्मची झाडं आणि पांढरा शुभ्र शामियाना असलेल्या 'सुंदर लॉन'मध्ये पार पडला. 



यावेळी आकाशने श्लोकाला प्रपोज करत तिला एक हिऱ्याची अंगठी भेट दिली. या सोहळ्यात त्या दोघांचं खास फोटोशूटही करण्यात आलं.




लवकरच अडकणार लग्नबंधनात

आकाश अंबानीच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच आकाश आणि श्लोकाचा साखरपुडा देखील होणार आहे. आणि याच वर्षाच्या अखेरपर्यंत हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. या प्री-एंगेजमेंट सोहळ्याचे फोटो आकाश अंबानीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.


#akashambani

A post shared by Akash Ambani (@ambani_akash) on

 


कोण आहे श्लोका?

श्लोका ही मोठ्या हिरा व्यापारी असलेल्या रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. श्लोका आणि आकाश या दोघांमध्ये लहानपणापासूनच मैत्री आहे. या दोघांनी धिरूभाई अंबानी या शाळेतून आपलं शिक्षण घेतलं आहे. श्लोकाने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीतून पुढील शिक्षण घेतलं. श्लोका ही सध्या तिच्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक पदावर कार्यरत आहे. याव्यतिरिक्त श्लोका ही सामाजिक संस्था असलेल्या ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची संस्थापक सुद्धा आहे.



हेही वाचा

इशा देओलचं पुन्हा कमबॅक, 'केकवॉक'चा फस्टलूक जारी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा