Advertisement

इशा देओलचं पुन्हा कमबॅक, 'केकवॉक'चा फस्टलूक जारी


इशा देओलचं पुन्हा कमबॅक, 'केकवॉक'चा फस्टलूक जारी
SHARES

बराच काळ बॉलिवूडपासून लांब राहिलेली अभिनेत्री इशा देओल एका शॉर्ट फिल्ममधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या केकवॉक या शॉर्ट फिल्मचा फर्स्टलूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

राम कमल मुखर्जी आणि अभ्र चक्रवर्ती यांज्या दिग्दर्शनाखाली ही शॉर्ट फिल्म बनत आहे. हेमा मालिनीची मुलगी इशा देओल या शॉर्ट फिल्ममध्ये शेफच्या भूमिकेत दिसेल. इशाने ट्विटरवर याचा फस्ट लूक शेअर केला आहे.

 हा पहिला लूक शेअर करताना इशा म्हणते, गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभ दिवशी मला माझ्या शॉर्ट फिल्म केकवॉकचा पहिला लूक शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे.

केकवॉक या शॉर्ट फिल्मची निर्मिती दिनेश कुमार, शैलेंद्र कुमार आणि आरित्रा दास करत आहेत. मार्च महिना अखेरीस चित्रीकरणाला सुरुवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार कोलकातामध्ये केकवॉकचं चित्रीकरण होईल.

आतापर्यंत इशा देओल ने धूम, डार्लिंग, मनी है तो हानी है, नो एन्ट्री, आँखे, कँश या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 2015 मध्ये ती किल देम यंग हा तिचा चित्रपट होता. त्यांनतर ती काळ चित्रपटापासून लांब होती. आक्टोबर 2017 मध्ये तिने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement