पेट्रोल-डिझेलचा पुन्हा भडका

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आठवड्याभरापासून पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल 33 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 84 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 72 रुपये प्रतिलीटर एवढा झाला आहे.

पेट्रोल मुंबईत सर्वात महाग 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र गेल्या 7 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी चांगलाच उच्चांक गाठला आहे. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 76 रुपयांवर असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 84 रुपये प्रतिलीटर एवढ्या दराने विकला जात आहे. तर देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत मिळत आहे. मागील चार आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढ होत आहे.


हेही वाचा - 

मुंबईत पेट्रोल नव्वदी गाठणार?

पुढील बातमी
इतर बातम्या